Gold In Iron Ore | काय सांगता ! होय, गोव्यात लोहखनिजातून निघतंय सोनं

पणजी : वृत्तसंस्था – Gold In Iron Ore | गोव्यातील खाणींमधून (Mines in Goa) निर्यात करत असलेल्या लोहखनिजात सोनं असल्याचा दावा गोवा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाने एका संशोधनाअंती केला आहे. या सोन्याचे प्रमाण ७.७१-१३ इतके आहे. जर्नल ऑफ जियोसायन्स रिसर्चने (Journal of Geoscience Research) गोवा विद्यापीठाच्या (Goa University) वनस्पतिशास्त्र विभागाच्या संशोधक सुजाता दाभोळकर (Sujata Dabholkar) आणि प्रा. डॉ. नंदकुमार कामत (Dr. Nandkumar Kamat) यांचा रिसर्च पेपर (Research Paper) प्रकाशित केला. त्यात वरील दावा करण्यात आला आहे. (Gold In Iron Ore)

 

गोवा विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागातर्फे राज्यात असलेल्या खाणीतील खड्ड्यांमधून काढण्यात आलेल्या आणि निर्यात करण्यात आलेल्या लोहखनिजामध्ये सोने असल्याचे आढळले. दाभोळकर आणि डॉ. कामत यांचा असा दावा आहे की, राज्यातील हा पहिला शोध आहे की ज्यात आतापर्यंत निर्यात केलेल्या लोहखनिजात सोने असल्याचे आढळले आहे. त्यांनी येथून घेतलेल्या नमून्यांमधून आढळलेल्या सोन्याचे प्रमाण (घनता) ७.७१-१३ पीपीएम एवढे आहे. (Gold In Iron Ore)

गोव्यातील दुर्लक्षित खनिजसंपत्तीचे संशोधन करण्याची गरज असल्याचेही या दोघांचे म्हणणे आहे. गोव्यात लोहखनिजासाठी खाणींचा शोध पोर्तुगीजांच्या काळात लावण्यात आला. पोर्तुगीज प्रशासकांनी संशोधन आणि निर्यातीच्या उद्देशाने या खाणींचे वाटप आपल्या हितसंबंधियांना केले. यापैकी स्थानिक नागरिकांना दिलेल्या सुमारे १०० खाणी या २०१२ पर्यंत सुरू होत्या. पण ३५ हजार कोटी रुपयांच्या खाणघोटाळ्यामुळे या उद्योगावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली. ही बंदी दोन वर्षांनी उठवण्यात आली. पण २०१८ मध्ये पुन्हा दुसर्‍यांदा खाणी बंद करण्यात आल्या. खाणी बंद करण्याआधी १९५१ मध्ये फक्त ४.३६ टन उत्खनन आणि निर्यातीचे प्रमाण २०१० मध्ये ५० लाख टन एवढे प्रचंड झाले होते.

 

एक नियामक आणि काही खाजगी कंपन्यांनी केवळ लोह खनिज निर्यात करण्याचा सपाटा लावला.
या दोन्ही क्षेत्रांत भूमी रासायनिक मुल्यांकन करण्याबाबतची सक्षम अशी यंत्रणा नव्हती त्यामूळे या सोन्याच्या खनिजीकरणाकडे कानाडोळा करण्यात आल्याचे या शोधपत्रात नमूद करण्यात आले आहे.
या ठिकाणी जर सखोल संशोधन केले तर येथून वर्मीफॉर्म सोने, फायटोफॉर्म सोने आणि इतर बर्‍याच मौल्यवान वस्तुंचा शोध लागू शकतो,
असा दावाही या शोधपत्रात या दोन्ही संशोधकांनी केला आहे.

 

Web Title :- Gold In Iron Ore | researchers find traces of gold in iron ore deposits in goa

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा