Gold Price Update : सोन्याच्या किंमती खाली आल्यामुळे खरेदीदारांच्या चेहऱ्यावरील हास्य परतले, जाणून घ्या नवीन भाव

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – सोन्याच्या किंमतीत पुन्हा घट झाली आहे. सोन्याचा दर दहा ग्रॅम 300 रुपयांवर आला, तर चांदीचा दर 100 रुपयांनी मजबूत झाला. जागतिक बाजारपेठेतील सोन्याच्या किंमतीमध्ये मजबूतीचा परिणाम भारतीय सराफा बाजारावरही दिसून येत आहे.

शुक्रवारी सोन्याच्या किंमती 21 रुपयांनी वाढल्या. त्यानंतर सोने आता प्रति 10 ग्रॅम 49,644 रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहे. चांदी 259 रुपयांनी घसरून 66,784 रुपये प्रतिकिलोवर आली. यापूर्वी गुरुवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव 194 रुपयांनी वाढून 49,455 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. चांदीची किंमत 1,184 रुपयांनी वाढून, 66,969 रुपये प्रति किलो झाली. बुधवारी सोन्याचे दर 10 ग्रॅम 49,261 रुपये आणि चांदी 65,785 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली.

तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किंमतीतील मजबूत जागतिक निर्देशांमुळे भारतीय सराफा बाजारात वाढ दिसून येत आहे. भारतीय सराफा बाजाराच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अमेरिकेतील प्रोत्साहन पॅकेजच्या अपेक्षेसह कमकुवत डॉलरमुळे सध्या सोन्याच्या किंमतीतील हे चढ-उतार दिसून येत आहेत. जागतिक बाजारपेठेत सोन्याची किंमत प्रति औंस 0.80 डॉलरने घसरून 1889.60 डॉलरवर ट्रेंड करत आहे. त्याचबरोबर स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा भाव प्रति औंस 1885.12 डॉलर होता. चांदी 0.42 टक्क्यांनी घसरून 26.07 डॉलर प्रति औंस झाली.

या सर्वांच्या पार्श्वभूमीवर सराफा बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीत वाढ झाली असली तरी त्याची किंमत आणखी कमी होईल. हे लोक म्हणतात की, जागतिक अर्थव्यवस्थेतील सुधार आणि अमेरिका आणि चीनमधील तणावामुळे गुंतवणूकदार सोन्याऐवजी शेअर बाजाराकडे वळत आहेत. हेच कारण आहे की, नजीकच्या भविष्यात सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ संभव नाही. तथापि, दीर्घकालीन काळासाठी सोने हा एक चांगला गुंतवणूक पर्याय मानला जातो.