Gold Price Today | धनत्रयोदशी 2021 पूर्वी सोने झाले 1100 रुपये महाग, चांदीत 4900 रुपयांची तेजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Gold Price Today | ऑक्टोबरमध्ये सोने-चांदीच्या दरात चढ-उतार होत असला तरी तेजी (Gold Price Today) दिसून आली आहे. ही तेजी सुद्धा नोव्हेंबरच्या दुसर्‍या दिवशी धनत्रयोदशी येत असताना आली आहे. आकड्यांबाबत बोलायचे तर ऑक्टोबर महिन्यात सोन्याच्या किमतीत 1100 रुपयांपेक्षा जास्त तेजी पहायला मिळाली आहे.

 

तर चांदीच्या दरात 4900 रुपयांपेक्षा जास्त वाढ पहायला मिळाली आहे. जाणकारांनुसार एमसीएक्सवर सोने वायदा 47500 रुपयांपासून 48500 रुपयांपर्यंत पहायला मिळू शकतो.
तर चांदीचा दर 65000 रुपए प्रति किलोग्रॅम पहायला मिळू (Gold Price Today) शकतो.

 

सोन्याचा आजचा नवीन दर (Gold Price Today)

 

भारतीय वायदा बाजार मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किमतीत वाढ पहायला मिळत आहे.
आकड्यांनुसार, 30 सप्टेंबरला सोन्याची किंमत 46521 रुपये प्रति 10 ग्रॅम पहायला मिळाली होती.
तर ऑक्टोबरच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवसात सोन्याची किंमत 47635 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आली आहे.

 

धनत्रयोदशीला सोने जाऊ शकते 48500 रुपयांवर

 

याचा अर्थ हा आहे की, ऑक्टोबरच्या महिन्यात सोन्याच्या किमतीत 1114 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ पाहायला मिळली आहे.
29 ऑक्टोबरला सोन्याच्या दरात सुमारे 350 रुपयांची घसरण पहायला मिळाली आहे. जाणकारांनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याची किंमत 48500 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पाहायला मिळू शकते.

 

चांदीचा आजचा नवीन दर (Silver Price Today)

 

दुसरीकडे चांदीमध्ये सुद्धा किमतीत वाढ दिसून आली आहे. ऑक्टोबर महिन्यात चांदीच्या दरात 4900 रुपये प्रति किलोग्रॅमची तेजी पहायला मिळाली आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजच्या आकड्यांनुसार, 30 सप्टेंबरला चांदीचे दर 59,617 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाले होते.

 

65000 रूपयावर जाऊ शकते चांदी

 

तर ऑक्टोबरच्या अखेरच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा दर 64534 रुपए प्रति किलोग्रॅमवर आला.
या दरम्यान चांदीच्या किंमतीत 4917 रुपये प्रति किलोग्रॅमची तेजी पहायला मिळाली आहे. येणार्‍या धनत्रयोदशीला चांदीचा दर 65000 रुपये प्रति किलोग्रॅमच्या पुढे जाऊ शकतो.

 

जाणकार काय म्हणतात…

 

आयआयएफएलचे व्हाईस प्रेसीडेंट (कमोडिटी अँड करन्सी) अनुज गुप्ता यांच्यानुसार सप्टेंबर तिमाहीत सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ दिसून आली आहे.
ज्यामुळे ऑक्टोबर महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

 

याशिवाय देशात फेस्टिव्ह सीझन सुरू झाली आहे. ज्यामुळे किंमतीत वाढ पहायला मिळत आहे.
आगामी दिवसात यामध्ये आणखी जास्त तेजी पहायला मिळू शकते. (Gold Price Today)

 

Web Title : Gold Price Today | before dhanteras 2021 gold becomes costlier by rs 1100 silver rises by rs 4900

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

IND vs NZ : विराट कोहलीने शमीला ट्रोल करणार्‍यांना फटकारले, म्हणाला – ‘धर्मावरून निशाणा बनवणे तुच्छता’

Gold Demand | गतवर्षीच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सोन्याच्या मागणीत ‘इतकी’ वाढ; जाणून घ्या

Bhandara Crime | दुर्देवी ! 2 चिमुकल्या बहीण-भावांचा खेळता-खेळता तलावात पडून मृत्यू