Gold Price Today | सोने घसरून 5 महिन्याच्या निच्चांकी स्तरावर पोहचले, खरेदीपूर्वी पहा 10 ग्रॅम सोन्याचे नवीन दर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 10 ऑगस्ट 2021 ला सोन्यात (Gold Price Today) पुन्हा घसरणीचा कल होता. यामुळे सोने आज 45 हजार रुपयांवर पोहचले. तर, चांदीच्या किमतीत (Silver) सुद्धा आज पुन्हा मोठी घसरण नोंदली गेली. यामुळे चांदी 62 हजार रुपये प्रति किग्रॅच्या खाली पोहचली.

मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात (Delhi Bullion Market) सोने 45,286 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर चांदी 62,663 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. भारतीय सराफा बाजाराच्या (Indian bullion market) उलट अंतरराष्ट्रीय बाजारात (International market) आज सोन्याचे दर वाढले, तर चांदीत विशेष बदल झाला नाही.

सोन्याचे नवीन दर

दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या भावात 176 रुपये प्रति 10 ग्रॅमची घट नोंदली गेली. यामुळे सोने 45 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव आज 45,110 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचून बंद झाला. याउलट अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आज वाढून 1,735 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

चांदीचा नवीन दर

चांदीच्या किमतीत आज पुन्हा जबरदस्त घसरण दिसून आली.
यामुळे चांदी 62 हजार रुपये प्रति किग्रॅच्या खाली पोहचली.
दिल्ली सराफा बाजारात (Delhi Bullion Market) मंगळवारी चांदीचा दर 898 रुपयांनी कमी होऊन 61,765 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला.
तर, अंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही आणि ती 23.56 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

सोने-चांदीत का झाली घसरण

एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Securities) चे सिनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की,
रुपयाच्या तुलनेत डॉलरमध्ये आलेल्या जबरदस्त तेजीमुळे सोन्याच्या किंमती सतत कमी होत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Police | हद्दीत अवैध धंदे सुरु असल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरणार

javelin throw | 7 ऑगस्टला देशभरात दरवर्षी होईल भालाफेक स्पर्धा, अ‍ॅथलेटिक्स संघाने केली घोषणा

Pune Crime | उद्योजक नानासाहेब गायकवाडसह मुलावर सावकारीचा आणखी एक गुन्हा

Maharashtra School Reopen | राज्याच्या ग्रामीण भागातील 5 वी ते 7 वी अन् शहरांमधील 8 वी ते 12 वीचे वर्ग 17 ऑगस्टपासून सुरू होणार