Gold Price Today | सोन्याचे दर वाढले, चांदी झाली स्वस्त; जाणून घ्या आजचे नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 10 नोव्हेंबर 2021 ला सोन्याच्या दरात (Gold Price Today) उसळी नोंदली गेली आहे. तर, चांदीच्या किमतीत (Silver) आज किरकोळ घट नोंदली गेली आहे. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 47,174 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर चांदी 63,642 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. भारतीय बाजाराच्या उलट आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर घसरले, परंतु चांदीच्या किमतीत मोठा बदल झाला नाही.

 

सोन्याचा आजचा दर (Gold Price Today)

 

दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात 137 रुपये प्रति 10 ग्रॅमची तेजी नोंदली गेली.
यामुळे दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर 47,311 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला आहे.
तर, आंतरराष्ट्रीय आजारात आज सोन्याच्या किमतीत घसरण नोंदली गेली आणि तो 1,827 डॉलर प्रति औंसवर पोहचला.
फॉरेक्स मार्केटमध्ये आज रुपया डॉलर (Rupee Vs Dollar) च्या तुलनेत 32 पैशांनी घसरून 74.37 च्या स्तरावर पोहचला.

 

चांदीचा आजचा दर (Silver Price Today)

 

चांदीच्या किंमतीत आज घसरण दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात बुधवारी चांदीचा दर 160 रुपयांच्या घटसह 63,482 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला.
तर, आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीचा दर 24.30 डॉलर प्रति औंसवर स्थित होता.

 

सोन्यात का आली तेजी

 

एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Security) चे सिनियर एनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की,
आज कॉमेक्स (COMEX) वर सोन्याचा हाजीर भावात (Spot Gold Prices) घट नोंदली गेली.
मजबूत डॉलर आणि अमेरिकन बाँड यील्डमध्ये वाढ झाल्याने सोन्याचे दर सतत दबावात आहेत. यामुळे सोन्याच्या दरात उलथा-पालथ सुरू आहे.
आज रुपया डॉलरच्या तुलनेत घसरल्याने सुद्धा सोन्याच्या किमतीत तेजी आली आहे. (Gold Price Today)

 

Web Title : Gold Price Today | gold price rose today and silver declines on 10 november 2021 check update gold rates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Lpg Cylinder | ‘या’ नंबरवर मिस्ड कॉल देऊन बुक करा LPG Cylinder, जाणून घ्या कसे करू शकता बुकिंग

Joint Pain In Winter | थंडीत त्रास देतील सांधे आणि हाडांच्या वेदना, ‘या’ 5 पद्धतीने मिळेल आराम

Pune BJP Protest | पुण्यात भाजप आक्रमक ! नवाब मलिकांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला