Gold Price Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण ! 3,500 रुपयांनी स्वस्त झाले, चांदीही उतरली; जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. सोने आणि चांदीच्या किंमतीत आज पुन्हा एकदा जोरदार घसरण झाली आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याच्या दरात 325 रुपयांची घसरण झाली. मागील पाच दिवसात सोन्याच्या दरात 3,500 रुपयांची घसरण (Gold Price Down) झाली आहे. आज सकाळपासून एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा वायदा दर 325 रुपयांनी कमी होऊन 51999 रुपयांवर ट्रेड करत आहे.

 

मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत घसरण दिसत आहे. आज एमसीएक्सवर सोने – चांदी दोन्हीमध्ये घसरण दिसत आहे. एमसीएक्सवर चांदीचा दर सुद्धा 561 रुपयांनी घसरून 68,283 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे.

 

तर मागील आठवड्यात एमसीएक्सवर सोन्याचा दर 55,600 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला होता. म्हणजे अवघ्या पाच दिवसांच्या आत सोन्याच्या किंमतीत 3,500 रुपयांची घसरण झाली आहे.

 

सोन्याच्या किमतीत झाली घसरण
रशिया – यूक्रेन युद्धादरम्यान जागतिक बाजारात विक्री दिसत आहे.
अनेक देशांची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. जर जागतिक बाजारावर नजर टाकली तर आज सोन्याची किंमत कमी झाली आहे.
कारण रेट हाईकच्या अपेक्षामुळे अमेरिकन ट्रेजरी यील्डमध्ये तेजी दिसून आली.
आज यूक्रेन आणि रशियामधील संकट नष्ट करण्यासाठी दोघांमध्ये चर्चा होणार आहे.

 

Web Title :- Gold Price Today | gold price today 15 march 2022 gold price slashed heavily last week silver rate also down know latest rates

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा