Gold Price Today | खुशखबर! आज चांदीच्या किमतीत मोठी घसरण, सोने सुद्धा झाले स्वस्त; जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात (Gold Price Today) आज बुधवारी पुन्हा एकदा घसरण दिसून येत आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने फेब्रुवारी वायदा 0.46 टक्के घसरले आहे. या घसरणीनंतर आज सोने (Gold Price Today) 48080.00 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे.

तसेच, चांदीच्या किमतीत (Silver price today) सुद्धा आज मोठी घसरण दिसून येत आहे. आज चांदी 1.20 टक्के घसरून 60,000 रुपयांवर आली आहे.

विक्रमी किमतीपेक्षा जवळपास 8500 रुपयांनी स्वस्त
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचा दर आपल्या सर्वोच्च स्तरावर पोहचला होता. ऑगस्ट 2020 मध्ये सराफा बाजारात सोन्याचा दर 55,400 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. जर आपण आजच्या दराची सोन्याच्या सर्वोच्च दराशी तुलना केली तर सोने आपल्या विक्रमी स्तरापासून जवळपास 8500 रुपये स्वस्त झाले आहे. (Gold Price Today)

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकता.

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या
ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या.
पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते.
विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते.
यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

 

Web Title :- Gold Price Today | gold price today 15th dec 2021 silver rate at 60k gold rate also huge drop check aaj che sonyache dar sone chandi bhav

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mula-Mutha River Rejuvenation Project | मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत बंडगार्डन ते मुंढवा दरम्यानच्या कामाची 650 कोटी रुपयांची निविदा मागविली

PM Kisan Scheme | 10 व्या हप्त्याबाबत समोर आली मोठी माहिती, जर तुमचा सुद्धा अडकला असेल जुना हप्ता तर अकाऊंटमध्ये येतील पूर्ण 4000 रुपये; जाणून घ्या

 

Pune Crime | पुण्यातील कल्याणीनगर परिसरात पैशांसाठी 13 आणि 9 वर्षाच्या मुलींसह पती-पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा; जाणून घ्या प्रकरण