Gold Price Today | सोनं खरेदीची सुवर्णसंधी ! 9358 रूपयांनी झालं Gold स्वस्त, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Gold Price Today | देशान्तर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती (Gold Price Today) उतरताना दिसत आहेत. मागील काही आठवड्यात सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ होत होती. मात्र, आता त्याच्या किंमतीत घट होताना पाहायला मिळत आहे. तर सोन्याच्या दरात आज देखील घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा भाव 0.17 टक्क्यांनी उतरला आहे. आज सोन्याचा भाव 46,815 रुपये प्रति तोळावर पोहचला आहे. तर चांदीचा दर (silver price) 63,421 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे.

विशेष म्हणजे मागील चार दिवसापासून सोन्याच्या किंमतीत (Gold Price) घसरण होत आहे.
त्यामुळे सोनं सध्या 9,358 रुपये स्वस्त मिळत आहे.
सोने गतवर्षी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) ऑगस्ट महिन्यात 56,200 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते.
दरम्यान, सोन्या-चांदीचा भाव (Gold Silver Price) ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याची वायदे किंमत आज 46,815 रुपये प्रति तोळा आहे.

कशी तपासाल सोन्याची शुद्धता?

जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.
BIS Care app द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता.
या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता.
या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात.

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याची किंमत –

22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.
काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल.
शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

 

Web Title : Gold Price Today | gold price today down by 9358 rupees from record high check latest 10 gram gold rates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | खुशखबर ! 15 दिवसानंतर आठवड्यात केवळ 4 दिवस काम आणि 3 दिवस सुटी, ‘टेक होम सॅलरी’ होणार कमी; ‘हे’ नियम होणार लागू

Maharashtra Politics | संभाजी ब्रिगेडचे भाजपसोबत युतीचे ‘संकेत’; महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ?

Pune Crime | ‘आयुष’ मंत्रालयाचा संदर्भ देऊन 23 कोटी 45 लाखांची फसवणूक; पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ऋषिकेश पाटणकरला अटक