Gold Price Today | सोन्यात घसरणीचा कल सुरूच, चांदीही झाली 515 रुपये स्वस्त, जाणून घ्या आजचे नवीन दर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात (Gold Price Today) सतत सुरू असलेला घसरणीचा कल कायम राहिला. आज 1 सप्टेंबर 2021 ला दिल्ली सराफा बाजारात घसरण नोंदली गेली. तर, चांदीच्या किमतीत सुद्धा घट झाली. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,129 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 62,336 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. अंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोन्याचा दर घसरला, तर चांदीत मोठा बदल झाला नाही.

सोन्याचा नवीन दर (Gold Price Today)

दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात अवघ्या 6 रुपये प्रति 10 ग्रॅमची घट नोंदली गेली. दिल्ली 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर 46,123 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचून बंद झाला. अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,811 डॉलर प्रति औंसवर पोहचला.

चांदीचा नवीन दर (Silver Price Today)

चांदीच्या किमतीत सुद्धा आज घसरणीचा कल होता. दिल्ली सराफा बाजारात बुधवारी चांदीचा दर 515 रुपयांच्या घसरणीसह 61,821 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला. तर, अंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात कोणताही विशेष बदल झाला नाही आणि तो 23.82 डॉलर प्रति औंसवर पोहचला.

सोन्यात का झाली घसरण

एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Securities) चे सिनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की, अंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमतीत लागोपाठ उलथा-पालथ सुरू आहे.
आज कॉमेक्सवर सोन्याचा हाजीर दर कमी झाला. तर, भारतीय शेयर बाजारात तेजीचा कल आहे.
यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव आहे.

Pune Crime | ‘पप्पी दे’ असे म्हणत घरात घुसून अश्लील कृत्य करत 16 वर्षीय मुलीचा 26 वर्षीय युवकाकडून विनयभंग

5 Money Task | डायरीत नोंद करा 30 सप्टेंबरची तारीख, ‘या’ महिन्यात ‘ही’ सर्व कामे पूर्ण करण्याची आहे डेडलाइन; जाणून घ्या

‘e-SHRAM’ च्या वेबसाइटवर या लोकांनी आवश्य करावे रजिस्ट्रेशन, थेट खात्यात येऊ लागतील सरकारी पैसे; जाणून घ्या

Gold Price Today | किमतीमधील हालचालीने गुंतवणुकदारांमध्ये गोंधळ ! आता ‘या’ कॅरेटचं सोनं 27635 रुपयात 10 ग्रॅम, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update