Gold Price Today | सोनं पुन्हा 1000 रुपयांनी झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय बाजारात सोन्याच्या किमतीत पुन्हा घसरण झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचा वायदा भाव 0.25 टक्क्यांनी घसरून 47,510 रुपये (Gold Price Today) तर चांदीचा वायदा भाव 0.22% वाढून 67,520 रुपये प्रति कि.ग्रॅ. झाला आहे. जागतिक बाजारात पाच सत्रात सोन्याची किंमत (Gold Price Today) सुमारे 1000 रुपयांनी घटली आहे.

सोन्याची किंमत वाढू शकते

जागतिक बाजारात अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. हाजीर सोन्याचा भाव औंस 0.2% कमी होऊन 1,803.33 डॉलर प्रति औंस होता. तज्ज्ञांनुसार सोन्याची किंमत लवकरच ट्रेंड उलटल्यानंतर एका महिन्यात प्रति 10 ग्रॅम 48,500 पर्यंत पोहचू शकते.

अनेक पटींनी वाढली सोन्याची आयात

कोरोना संकटकाळात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय ठरलेल्या सोन्याच्या आयातीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. 2021-22 या आर्थिक वर्षातील एप्रिल- मे महिन्यांच्या तुलनेत गेल्यावर्षीच्या तुलनेत अनेक पटींनी सोन्याची आयात वाढली आहे.

अर्थव्यवस्थेत मोठी तूट

एप्रिल-मे महिन्यात देशात 7.91 कोटी डॉलर्स किमतीचे सोने आयात झाले. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत मोठी तूट नोंदली गेली. तुटीचा हा आकडा तब्बल 21.38 अब्ज डॉलर्स आहे.

Web Title : Gold Price Today | gold price today gold prices fall again rs 1000 find out todays rates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Rains | पुण्यात एकाच दिवसात 80 मिमीची ‘बरसात’ वडगाव शेरीत 100, गिरीवनला 149 मिमी पावसाची नोंद

Anti Corruption | 2 कोटी रूपयांच्या लाच प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 10 लाख पोलिसानं घेतले; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ

Jammu and Kashmir | दहशतवाद्यांविरोधातील सर्च ऑपरेशनमध्ये जवान कृष्ण वैद्य शहीद; कृष्णा घाटी सेक्टरमध्ये चकमकीत 2 अतिरेकी ठार