Gold Price Today | सोन्याच्या दरात आली तेजी, आज किती रूपयांनी महागले 1 तोळा सोने, जाणून घ्या

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात (Gold Price Today) वेगाने चढ-उतार सुरू आहे. अशावेळी तुम्ही खरेदीचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दिवाळीला सोन्यात जोरदार विक्री झाली. सणासुदीचा काळ संपल्यानंतर आता लग्नसराई सुरू झाली आहे. अशावेळी सोने-चांदीच्या दराला वाढलेल्या (Gold Price Today) मागणीचा पाठींबा मिळत आहे. सोने पुन्हा एकदा हळुहळु 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दराकडे चालले आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज डिसेंबर डिलिव्हरीच्या सोन्याच्या दरात 0.11 टक्के तेजी नोंदली गेली आहे. तर चांदीचा दर (Silver price) 0.50 टक्के घसरणीसह व्यवहार करत आहे.

जाणून घ्या काय आहे सोने-चांदीचा दर  

ऑक्टोबर डिलिव्हरी सोन्याचा दर आज 0.11 टक्के घसरणीसह 49,350 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर आहे. तर आजच्या व्यवहारात चांदी 0.50 टक्के घसरली. आज 1 किलो चांदीचा दर 66,895 रुपये आहे. (Gold Price Today)

हे देखील वाचा

Pune | युवा शास्त्रज्ञ भीमाशंकर गुरव यांचा मंत्री दत्तात्रय भरणे व धिरज केसकर यांच्याकडून विषेश सत्कार

Anti Corruption Bureau Thane | लाच घेण्यासाठी ‘तो’ कार्यालयात रात्री साडेआठ वाजेपर्यंत थांबला; जात पडताळणी समितीचा सचिव ACB च्या जाळयात

Coronavirus in India | देशात कोरोना’ची 8865 नवी प्रकरणे आली समोर, 287 दिवसात आतापर्यंतचा सर्वात कमी आकडा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  gold price today jump silver rate also rises check 22k gold rate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update