Gold Price Today | सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Price Today । देशान्तर्गत बाजारात सोन्या-चांदीचा दर (Gold-Silver Price Today) सातत्याने खाली-वर होताना दिसत आहे. मागील काही आठवड्यामध्ये सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली. मात्र, गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या भावात पुन्हा किरकोळ घसरण होताना दिसत आहे. याचबरोबर आज (बुधवारी ) देखील सोन्याच्या भावात घसरण दिसून आली आहे. MCX नुसार आज सोन्याचा भाव प्रतितोळा 47,935 रुपयेवर पोहचला आहे. तसेच, चांदीच्या किंमतीत (silver price) 0.34 टक्क्यांची वाढ होऊन, सध्या प्रति किलो प्रमाणे 68,145 रुपये पर्यंत पोहचला आहे.

मागील दोन ते तीन दिवसापासून सोन्याच्या किंमतीत (Gold Price) किंचित वाढ होताना दिसत आहे. मागील सत्रात सोन्याच्या भावात 0.48 टक्क्यांची घसरण झालीय. गतवर्षी सोन्याचा दर हा 56,200 रुपयांपर्यंत उच्चांक आकडा गाठला होता. त्याची तुलना करता यंदा सोनं 8200 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. मात्र येत्या काळात सोन्याची किंमत वाढणार असल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे. तसेच, इतकंच नाही तर आगामी 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा भाव (Gold Price) 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडने (Quadriga Igneo Fund) दिले आहेत.

राज्यातील शहरामधील सोन्याचा दर (Gold Price) (प्रतितोळा) –

मुंबई : 46960 रुपये

पुणे : 46,230 रुपये

नागपूर : 46960 रुपये

नाशिक : 46,230 रुपये

हे देखील वाचा

Pune-Pimpri Chinchwad Police | पुणे अन् पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात मोठे बदल, पिंपरी ‘अपग्रेड’ होणार?

Mansukh Hiren Murder Case | मनसुख यांची हत्या करण्यासाठी तब्बल 45 लाखाचा व्यवहार; NIA चा मोठा खुलासा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Gold Price Today | gold rates gold price today gold rates in mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update