Gold Price Today-MCX Market India | सोन्याचा भाव 53 हजारच्या जवळ; पाहा कसं महागलं सोनं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today-MCX Market India | भारतीय सराफा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price) सातत्याने बदल होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढउतार होत आहे. रशिया आणि युक्रेनच्या (Russia And Ukraine) युद्धाचा परिणाम भारतीय सराफा बाजारात झाला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) सोन्याच्या किमती (Gold Price Today) जून 2022 च्या फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्टसाठी 53,000 रुपये प्रति 10 ग्रॅम जवळ पोहोचला आहे. (Gold Price Today-MCX Market India)

 

रेलिगेयर ब्रोकिंग लिमिटेड मध्ये कमोडिटी अँड करन्सी रिसर्चच्या उपाध्यक्षा सुगंधा सचदेवा (Sugandha Sachdeva) यांच्या माहितीनुसार, भारतीय बाजारात, एमसीएक्सवर सोन्याचा भाव (Gold Price) 53,500 ते 53,800 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचू शकतो. तर, रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष हे सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत वाढ होण्याचं एक कारण आहे. या दोन्ही देशातील शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत. त्याचबरोबर वाढत्या महागाईचा रिपोर्ट बाजारातील गोष्टींवर परिणाम करताहेत. मार्च महिन्यात अमेरिकी वार्षिक CPI वाढून 8.5 टक्के झालाय.

दरम्यान, भारतात लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. सोन्याचा किमतीसाठी हे प्रमुख देशांतर्गत ट्रिगर म्हणून काम करेल, कारण एप्रिल ते जूनमध्ये सोन्याची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे.
असं IIFL सिक्योरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता (Anuj Gupta) यांनी सांगितलं.

 

मिस्ड कॉलद्वारे माहिती करुन घ्या दर –
सोन्याचे दर शोधण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल,
ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

 

Web Title :- Gold Price Today-MCX Market India | gold price today 16 april 2022 mcx market in india

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा