Gold Price Today | सोन्यात जबरदस्त वाढ, चांदी सुद्धा महागली; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या भावात (Gold Price Today) लागोपाठ दुसर्‍या दिवशी म्हणजे 12 ऑगस्टला सुद्धा तेजी नोंदली गेली. तर, चांदीच्या किंमतीत (Silver) सुद्धा आज किरकोळ उसळी नोंदली गेली. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 45,138 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 61,201 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. अंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोन्याचे दर वाढले, तर चांदीमध्ये मोठा बदल झाला नाही.

सोन्याचा नवीन दर
दिल्ली सराफा बाजारात गुरूवारी सोन्याच्या भावात 422 रुपये प्रति 10 ग्रॅमची जबरदस्त तेजी नोंदली गेली. राष्ट्रीय राजधानीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव आज 45,560 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचून बंद झाला. अंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा सोन्याची किंमत वाढून 1,756 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

चांदीचा नवीन दर
चांदीच्या किंमतीत सुद्धा आज उसळी नोंदली गेली. दिल्ली सराफा बाजारात गुरूवारी चांदीचा दर 113 रुपयांच्या किरकोळ तेजीसह 61,314 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला. तर, अंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात आज मोठा बदल झाला नाही आणि ती 23.44 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

सोन्यात का आली तेजी
एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Securities) चे सिनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की, अमेरिकन बाँडच्या यील्डमध्ये पुन्हा एकदा घसरण आणि डॉलरच्या कमजोरीमुळे सोन्याच्या किंमतीत पुन्हा तेजी नोंदली जात आहे.

Web Title :- gold price today spiked by rupees 422 per 10 gram and silver also jumped check latest rates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Combing Operation | स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे ‘कोंबिंग ऑपरेशन’ ! 55 जणांना कारवाई; 31 कोयते, 4 तलवार, 1 पालघन, 1 सुरा जप्त

Mumbai High Court | पुण्यातील महत्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्प व्यवहार्य आहे का? – उच्च न्यायालयाचा सवाल

Dowry in Rural India | हुंडा देऊन झाले ग्रामीण भारतात 95% विवाह, डोळे उघडणारा जागतिक बँकेचा ‘हा’ अहवाल – स्टडी