सोन्याच्या दरात 8000 रूपये तर चांदीमध्ये 19000 रूपयांपेक्षा जास्तीची घसरण, जाणून घ्या पुढं कसा राहिल ‘ट्रेंड’

नवी दिल्ली : कोरोना संकटात गुंतवणुकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून गोल्डमध्ये जोरदार पैसा लावला. यामुळे सोन्याचे भाव आकाशाला भिडले होते. आता कोरोना व्हॅक्सीन लवकरच येणार असल्याच्या बातम्या, रुपयाला येत असलेली मजबूती आणि शेयर बाजाराने वेग पकडल्याने गुंतवणुकदारांनी सोन्यातून गुंतवणुक काढुन दुसर्‍या पर्यायांमध्ये लावण्यास सुरूवात केली आहे. यामुळे सोने आणि चांदीचे भाव मागील उच्च स्तरावरून खुपच खाली आले आहेत. सध्या तरी ते वेगाने वर जाण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. अपेक्षा आहे की, फेब्रुवारी 2021 पर्यंत गोल्डचे भाव 42,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास पोहचू शकतात. तर, चांदीच्या किंमतीत सुद्धा घट होण्याचा ट्रेंड जारी राहील.

चांदीच्या किमतीत 19,000 रुपयांपेक्षा जास्त घट
गोल्डने आपला मागील उच्च स्तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात गाठला होता. सोन्याचा भाव 7 ऑगस्टला 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आता शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 43 रुपयांच्या किंचित घसरणीसह 48,142 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. या आधारावर सोन्याच्या किंमतीत मागील उच्चस्तरापासून 8,058 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण नोंदली गेली आहे. तर, चांदीचा भाव 10 ऑगस्टला 78,256 रुपये प्रति किग्रॅ होता, जो शुक्रवारी म्हणजे 28 नोव्हेंबर 2020 ला 59,250 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला. या आधारावर चांदीच्या किमतीत उच्चस्तरापासून 19,000 रुपये प्रति किग्रॅपेक्षा जास्त घट झाली आहे.

फेब्रुवारीपर्यंत सोन्यात मोठी घसरण शक्य
सोने-चांदी शुक्रवारी 27 नोव्हेंबर 2020 च्या तुलनेत घसरणीसह बंद झाले. किमतीमधील घसरणीचे हे सत्र मागील काही काळापासून सतत सुरू आहे. अशावेळी सोन्या-चांदीच्या किंमतीत पुढेही घसरणीचा कल कायम राहण्याची शक्यता आहे. तर, फेस्टिव्ह सीझन संपल्यानंतर लग्नसराई सुरू झाली आहे. अशावेळी व्यापार्‍यांना आशा आहे की, किमतीत काही सुधारणा होऊ शकते, परंतु फेब्रुवारीपर्यंत सोन्याच्या भावात मोठी घसरण होऊ शकते. कारण, केंद्र सरकारने सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाशी कोरोना व्हॅक्सीनचे सुमारे 40 कोटी डोस खरेदी करण्याची चर्चा केली आहे. तसेच अपेक्षा आहे की, लवकरच दुसर्‍या कंपन्यासुद्धा वॅक्सीन तयार करतील. यामुळे बाजारात स्थिरता येईल आणि लोक दुसर्‍या पर्यायांमध्ये गुंतवणुक करू शकतील.

सोन्यात अपेक्षेपेक्षा जास्त झाली घसरण
बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे की, कोरोना व्हॅक्सीनमुळे येत असलेल्या सकारात्मक बातम्यांमुळे गोल्डच्या किंमतीमध्ये अपेक्षापेक्षा जास्त वेगाने घसरण झाली आहे. जस-जशी कोविड-19 व्हॅक्सीनबाबत प्रगती वाढत जाईल, जगभरात आर्थिक स्थिती रूळावर परण्यास सुरूवात होईल.

घसरणीचा कल कायम राहील
यामुळे लोक गोल्डमध्ये गुंतवलेले पैसे काढून शेयर बाजारात किंवा दुसर्‍या पर्यायांमध्ये गुंतवणुकीचा मार्ग धरतील. यामुळे गोल्डच्या किमतीत सतत घसरणीचा कल कायम राहील. भारतात मध्येच स्थानिक मागणी वाढल्यास भावाला तात्पुरता आधार मिळत राहील. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीसोबत कोरोना व्हॅक्सीन बनवत असलेल्या एस्ट्राजेनेकाने दावा केला आहे की, त्यांची व्हॅक्सीन खुप स्वस्त आहे आणि दुसर्‍या व्हॅक्सीनपेक्षा 90 टक्के जास्त परिणामकारक असेल.