जाणून घ्या सोन्याच्या भाव का घसरतोय ?

पोलिसनामा ऑनलाईन : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात ५ टक्के कपात करण्याची घोषणा केली होती. सध्या सोन्या-चांदीवर १२.५% आयात शुल्क भरावं लागणार आहे. या कपातीनंतर आता केवळ ७.५% आयात शुल्क आकारले जाईल. ज्यामुळे किंमती खाली येत आहेत. तसेच गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याने प्रति १० ग्रॅम ५६,२०० रुपयांची विक्रमी पातळी गाठली. पण ऑगस्टपासून सोन्यामध्ये सतत घसरण झाल्याचं समोर आलं आहे.

ऑगस्टच्या किंमतीपासून आतापर्यंत सोनं सुमारे ११ हजार रुपयांनी स्वस्त झालं. देशांतर्गत बाजारात सोनं ४५ हजार रुपयांच्या खाली गेलं आहे. खरंतर, २ मार्च रोजी सोन्याचा वायदा भाव प्रति १० ग्रॅम ४४,७६० रुपयांवर पोहोचला. ३ मार्च रोजी सोन्याचा वायदा भाव १० ग्रॅम ४५,५०० रुपयांवर पोहोचला. इतकंच नाहीतर देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट झाल्याचं दिसून आलं.

दिल्ली बुलियन मार्केटमध्ये एक किलो चांदीची किंमत ६०२ रुपयांनी वाढून ६८,१९४ रुपये झाली. मंगळवारी एका दिवसापूर्वीच ही किंमत ६७,५९२ रुपयांवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीची किंमत २६ औंस डॉलर प्रति औंसपर्यंत घसरली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याच्या किंमतींमधील घसरणीमागे सोन्यातील मंदी हे एक मोठं कारण आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं प्रति औंस १,७१९ अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढलं. जागतिक वायदा भाव कॉमेक्सवर सोनं प्रति औंस १,७३३ डॉलरवर पोहोचलं आहे.