रेकॉर्डब्रेक ! आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्यानं गाठली आत्तापर्यंतची ‘उच्चांकी’, भारतावर होणार ‘थेट’ परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इराणकडून इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर हल्ले करण्यात आले. त्यामुळे जगभरात तणाव निर्माण झाला आहे. जगभरातील गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करत आहे. या कारणाने आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर वाढले आहेत. बुधवारी सोन्याच्या किंमती 1,611 डॉलर प्रति औंस (28.3495 ग्राम) वर पोहचल्या. यापूर्वी 2013 मध्ये सोन्याचे दर 1,610.90 डॉलर प्रति औंस एवढ्या उच्चांकावर पोहचले होते.

देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. सोमवारी सोन्याच्या किंमतीत तेजी आल्यानंतर मंगळवारी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. मंगळवारी एका दिवसात सोनं 420 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त झालं होतं.

भारतावर परिणाम –
या दरम्यान चांदीच्या किंमतीत 830 रुपयांनी मोठी घसरण झाली. बुधवारी पुन्हा एकदा सोन्याच्या दरात तेजी आली आहे. याचा परिणाम भारतावर देखील पाहायला मिळत आहे. भारतात सोन्याच्या किंंमतीत सतत वाढ होत आहे. कमोडिटी एक्सचेंज MCX वर सोन्याच्या वायदा बाजारात सुरुवातीच्या 20 मिनिटात सोन्याचे दर 582 रुपयांनी वाढून सोनं 41,245 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.

तर फेब्रुवारीत विक्री होणाऱ्या चांदीत एमसीएक्सवर 675 रुपये तेजी आल्याने चांदी 48,806 रुपये प्रति किलो झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारी 1,600 डॉलर प्रति औंसवर सोने पोहचले आहे.

का आहे अमेरिका आणि इराणमध्ये तणाव –
अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढल्याने कमोडिटी बाजारीतील किंमतीत तेजी आली आहे. क्रुड तेलाच्या किंमती देखील वाढल्या. तसेच सोन्याच्या किंमतीत थोडी तेजी पाहायला मिळाली. अमेरिकेने इराकची राजधानी बगदादमध्ये हवाई हल्ला केला होता त्यात इराणच्या जनरल कासिम सुनेमानी मारले गेले. असे सांगण्यात येते की सुलेमानी बगदादच्या एअरपोर्टवर जात होते तेव्हा अमेरिकेकडून हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पॉप्युलर मोबलाइजेशन फोर्सचे डेप्युटी कमांडर अबू मेहदी अल मुहांदिसची मृत्यू झाला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/