Gold Price Today : गेल्यावर्षीपेक्षा स्वस्त दराने सोने आणि चांदी खरेदी करण्याची संधी, किंमतीत पुन्हा घट, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्यावर्षीपेक्षा स्वस्त दरात सोनं-चांदी (Gold-silver) खरेदी करण्याची संध्या संधी आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे (Gold) दर कमी होत आहेत. कोरोना (Corona) संकटाची तीव्रता कमी होऊ लागल्याने गुंतवणूकदार (Investors) भांडवली बाजाराकडे वळाले आहेत. त्यामुळे सुरक्षित वाटणाऱ्या सोन्याची चकम फिकी होऊ लागली आहे. मंगळवारी एक्सचेंज (Exchange) उघडल्यानंतर ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्याची वायदे किंमत 43 रुपयांनी कमी झाली. सध्या सोने (Gold) 49,100 रुपये प्रति तोळा झाले आहे. तर ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याचे दर देखील 49,403 रुपयांवर आहेत. चांदीचे दर दखील कमी झाले आहेत.

सोने 7000 रुपयांनी कमी
स्थिर ग्लोबल रेट्स असताना भारतात सोन्या-चांदीच्या दरात घसरण पहायला मिळत आहे.
आधीच्या सत्रात MCX वर सोन्याचे दर घसरणीनंतर 49,131 रुपये प्रति तोळा होते.
तर चांदीचे दर 0.3 टक्क्यांनी कमी होत 71,619 रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत.
तज्ज्ञांच्या मते देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर सध्या 49,550-49,750 या स्तरावर राहतील. दरम्यान असं असलं तरी हा भाव गेल्यावर्षीच्या सर्वोच्च स्तरापेक्षा जवळपास 7 हजार रुपयांनी कमी आहे. गेल्या ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते.

चांदीच्या दरात घसरण
एचडीएफसी सिक्योरिटीजच्या (HDFC Securities) मते आंतरराष्ट्रीय बाजारात (international market) घसरणीमुळे सोमवारी (दि.7) दिल्लीमध्ये सोन्यामध्ये घसरण पहायला मिळाली.
152 रुपयांच्या घसरणीनंतर याठिकाणी सोन्याचे दर प्रति तोळा 48 हजार 107 रुपये इतके होते. चांदीचे दर देखील 540 रुपयांनी कमी होऊन 69 हजार 925 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच भाव 1833 डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव 27.55 डॉलर प्रति औंस होता.

देशातील प्रमुख राज्यातील भाव
24 कॅरेट सोन्याचा दर 4851 प्रति ग्रॅम, 38,808 रुपये प्रति ग्रॅम, 48,510 रुपये प्रति तोळा आणि 4 लाख 85 हजार 100 रुपये प्रति 100 ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 47,510 आहे. तर आजचा चांदीचा भाव प्रति किलो 71 हजार रुपये आहे.
हे भाव गुड रिटर्न वेबसाईटवरील आहे.

दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 47,950 आणि 24 कॅरेटचा दर 52,300 रुपये प्रति तोळा आहे.

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 47,510 आणि 24 कॅरेटचा दर 48,510 रुपये प्रति तोळा आहे.

कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 48,030 रुपये आणि 24 कॅरेटचा सोन्याचा दर 50,730 रुपये प्रति तोळा आहे.

चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,050 रुपये आणि 24 कॅरेटचा सोन्याचा दर 50,240 प्रति तोळा आहे.

Also Read This : 

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

 

Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत