Gold Rate in Pune | सोन्याचांदीच्या दरात चढ-उतार, जाणून घ्या पुण्यातील आजचे सोन्याचांदीचे दर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – जुलै महिन्याच्या पहिला तारखेला (Gold Rate in Pune) पुण्यात 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 190 रुपये प्रति तोळा होते. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार 190 प्रति तोळा इतका होता. सोन्याच्या दरात मागिल काही दिवसांपासून चढ-उतार पहायला मिळत आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेले हे पुण्यातील सोन्याचे दर (Gold Rate in Pune) आहेत. जुलै महिन्याच्या आठ दिवसांत सोन्याचे दर 750 रुपयांनी वधारले आहेत. यानंतर 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर अनुक्रमे 46 हजार 980 आणि 47 हजार 980 रुपये प्रति तोळा झाले आहेत. पुण्यात चांदीच्या दरात (Silver Rate) देखील मोठी घसरण झाली आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पुण्यातील आजचे सोन्याचे दर ? (Gold Price in Pune)

Good Returns वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आज पुण्यामध्ये 22 कॅरेटचा दर 46980 रुपये प्रति तोळा आहे. बुधवारी पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा दर 46970 रुपये प्रति तोळा होते. यामध्ये आज 10 रुपये प्रति तोळा वाढ झाली आहे. तर बुधवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 47970 रुपये प्रति तोळा होता. यामध्ये 10 रुपये प्रति तोळा वाढ झाली आहे. आज पुण्यामध्ये 24 कॅरेट सोने 47 हजार 980 रुपये प्रति तोळा दराने विकले जात आहे.

पुण्यातील चांदीचे दर (Silver Price in Pune)

पुण्यात सोन्याच्या दरामध्ये किरकोळ वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात (Silver Price) मोठी घसरण झाली आहे. प्रति किलो चांदीचे दर एक हजार रुपयांनी कमी झाले आहेत. या घसरणीनंतर पुण्यातील चांदीचे दर 69000 हजार रुपये प्रति किलो झाले आहेत. बुधवारी हेच दर 70 हजार रुपये होते. चालु महिन्याच्या 8 दिवसात चांदीमध्ये 300 रुपयांची घसरण झाली आहे. मागील आठ दिवसांमध्ये सोन्याप्रमाणे चांदीच्या दरात देखील चढ-उतार पहायला मिळत आहेत.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Web Title : Gold Rate in Pune | 8th july 2021 in pune city check 24 and 22 carat gold rates

 

हे देखील वाचा

Pune Police News | 27 वर्षीय तरूणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार,
पोलिस कर्मचार्‍याला पोलिस कोठडी

Basmati Rice | ‘किंग ऑफ राईस’ – बासमती चे उत्पादन कमी – ‘फाम’चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा

Modi Cabinet Expansion | केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नारायण राणेंनी मानले ‘या’ 4 जणांचे आभार

UIDAI ने Aadhaar Card संबंधीत 2 विशेष सेवा अनिश्चित काळासाठी केल्या बंद; जाणून घ्या

Modi Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता भाजप संघटनेतही होणार बदल; प्रकाश जावडेकर, ‘या’ दिग्गजांना मिळणार महत्त्वाची जबाबदारी