Gold Price Update : सोने खरेदी करणार्‍यांसाठी खुशखबर, पुन्हा घसरले दर, येथे जाणून घ्या 10 ग्रॅम गोल्डचे ताजे भाव

नवी दिल्ली : कोरोनाचा कहर आणि लग्नसराईत सोने खरेदी करणार्‍यांसाठी चांगली बातमी आहे. तुम्हाला सुद्धा लग्नानिमित्त सोने खरेदी करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सोन्याच्या दरात चढ-उताराचे सत्र सतत सुरू आहे. सोमवारी सोने आणि चांदीची चमक पुन्हा कमी झाली. भारतीय सराफा बाजारांत सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 47000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास होता तर चांदीची किंमत 68000 रुपयांच्या वर होती.

सोमवारी 24 कॅरेटपासून 14 कॅरेटपर्यंतच्या सोन्याच्या किंमतीत बदल दिसून आला. सोमवारी देशभरात सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा हाजिर भाव शुक्रवारच्या तुलनेत 60 रुपयांनी घसरून 46900 रुपयांवर बंद झाला. शुक्रवारी सोन्याची किंमत 46960 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. तर सोमवारी 23 कॅरेट सोन्याची किंमत – 46772 रुपये, 22 कॅरेट सोने – 43015 रुपये आणि 18 कॅरेटचे सोने 35220 रुपये 10 ग्रॅमवर बंद झाले.

चांदीचा दर सोमवारी 68297 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला. सोमवारी चांदीच्या किंमतीत 178 रुपयांची किंचित तेजी दिसून आली. शुक्रवारी चांदी 67800 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर बंद झाली होती.

सोन्याचा ऑल टाइम हाय रेट 9300 रुपयांपर्यंत घसरला आहे. 7 ऑगस्ट 2020 ला सोने आपल्या ऑल टाइम हाय रेट 56200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले होते. तर सोमवारी सोने 46900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले आहे. जर या किंमतीची तुलना केली तर सोने सध्या 9300 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त मिळत आहे.

येत्या काळात सोन्याच्या किंमतीत वाढीची शक्यता वर्तवली जात आहे. जाणकारांनुसार आगामी काळात स्थानिक बाजारात सोन्याची किंमत 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकते.