Gold Rate Today : 3 दिवसांमध्ये 2 वेळा सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नववर्षाच्या सुरवातीलाच सोन्या आणि चांदीच्या किमती अस्थिर झाल्यात. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आज सोन्याचा भाव वाढल्याचे संकेत मिळत आहेत. परंतु डॉलरच्या मजबुतीमुळे तेजी पाहायला मिळत नाहीये. मंगळवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारीच्या सोन्याच्या वायदा भाव प्रति १० ग्रॅमसाठी ०.०३ टक्क्यांनी कमी झालाय. सोन्यासारखे चांदीचे दरही घसरले आहेत. मार्चचा चांदीचा वायदा भाव ०.२२ टक्के प्रति किलोग्रॅमनं पडलाय. शुक्रवारी मोठ्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात ०.७ टक्के तेजी आली होती.ग्लोबल संकेतांनुसार तीन दिवसांत दुसऱ्यांदा सोन्याच्या दरामध्ये घसरण झालीय.

MCX वर आज फेब्रुवारीच्या सोन्याचा वायदा भाव १४ रुपयांनी घसरून ४९,३२८ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. चांदीची किंमत १५५ रुपयांनी घसरून ६५,४०० रुपये प्रति किलोग्रॅम झालीय. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आज सोन्याचा भाव वाढल्याचे संकेत मिळत आहेत. परंतु डॉलरच्या मजबुतीमुळे तेजी पाहायला मिळत नाहीये. स्पॉट गोल्ड ०.२ टक्क्यांनी वाढून १८४७.९६ डॉलर प्रति औंस, तर चांदी ०.८ टक्क्यांनी वाढून २५.११ डॉलर प्रति औंस झालीय.

सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोने ३८९ रुपयांनी वाढून ४८८६६ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले. मागच्या सत्रात सोने ४८४७७ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते. चांदीची किंमतही या सत्रात ११३७ रुपयांच्या तेजीसह ६४७२६ रुपये प्रति किलोग्रामवर बंद झालीय, मागच्या व्यापार सत्रात ६३५८९ रुपये प्रति किलोग्रामवर बंद झाली.

सरकार विकतंय स्वस्त सोनं
सॉवरेन गोल्ड बॉन्डची दहावी मालिकेंतर्गत ११ जानेवारी ते १५ जानेवारीदरम्यान यात गुंतवणूक करू शकता. यासाठी सेटलमेंटची शेवटची तारीख १९ जानेवारी आहे. दहाव्या मालिकेत जर कोणत्याही गुंतवणूकदारानं ऑनलाईन अप्लाय केल्यास डिजिटल मोडमध्ये पेमेंट केले जाते. त्यांना ५० रुपये प्रति ग्रॅम सूट मिळते. यासाठी रिझर्व्ह बँकेनं एक ग्रॅम सोन्याची किंमत ५१०४ रुपये ठेवली आहे.