Gold Price Today : स्वस्त झाले सोने, ‘विक्रमी’ स्तरावरून 9000 रुपयांनी घसरला भाव, चेक करा लेटेस्ट रेट्स

नवी दिल्ली : सोने खरेदी करणार्‍यांसाठी आज चांगली बातमी आहे. जर तुम्ही विवाहासाठी सोने खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही वेळ चांगली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सकाळी पुन्हा सोन्याच्या भावात घसरण दिसून आली. याशिवाय चांदीसुद्धा स्वस्त झाली आहे. एमसीएक्सवर सोन्यात मार्चचा फ्यूचर ट्रेड 39.00 रुपयांच्या घसरणीसह 47,217.00 रुपयांच्या स्तरावर सुरू होता. तर, चांदीचा मार्चचा फ्यूचर ट्रेड 130.00 रुपयांच्या घसरणीसह 68,608.00 रुपयांच्या स्तरावर ट्रेड करत होता.

6 सत्रांपैकी 5 सत्रांत सोन्याच्या किंमतीत घसरण आली आहे, ज्यामुळे सोने आपल्या ऑगस्ट 2020 च्या विक्रमी उच्च 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून 9000 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

इंटरनॅशल मार्केटमध्ये सुद्धा वाढली विक्री
याशिवाय इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा सोन्याची विक्री वाढलेली होती. सोमवारी अमेरिकेत सोन्याचा व्यवहार 2.92 डॉलरच्या घसरणीसह 1,811.22 डॉलर प्रति औंसच्या रेटवर होत आहे. तर, चांदीचा व्यवहार 0.03 डॉलरच्या तेजीसह 26.94 डॉलरच्या स्तरावर होत आहे.

राजधानी दिल्लीतील सोन्याचे आजचे भाव –
* 22 कॅरेट सोन्याचा भाव – 46220 रुपये
* 24 कॅरेट सोन्याचा भाव – 50420 रुपये
* सिल्व्हरचा भाव – 68700 रुपये

का होत आहे घसरण?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या बजेट भाषणात सोने आणि चांदीवर आयात शुल्कात मोठ्या कपातीची घोषणा केली आहे. सोने आणि चांदीवर आयात शुल्कात 5 टक्केची कपात केली आहे. सध्या सोने आणि चांदीवर 12.5 टक्के आयात शुल्क द्यावे लागते. 5 टक्केच्या कपातीनंतर केवळ 7.5 टक्के इम्पोर्ट ड्यूटी द्यावी लागेल. यामुळे सोने-चांदीच्या किमतीत घसरण दिसून येत आहे.