Gold Silver Price Today | सोने आणि चांदीच्या किंमतीत तेजी; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | जागतिक शेअर बाजारात (Global Stock Market) सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) वारंवार बदल होत आहे. भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सोन्या चांदीच्या किंमती वधारले असल्याचं पाहायला मिळत आहे. आज (सोमवारी) मल्टीकमोडिटी एक्सचेंजमध्ये (Multi Commodity Exchange) सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या किंमतीत देखील वाढ झाल्याचं दिसत आहे.

 

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने सोन्याची मागणी वाढत आहे. त्याचबरोबर सोन्यात 282 रुपयांची वाढ होत 51,111 रुपये प्रति तोळे इतके ट्रेड करीत होते. तसेच, चांदी 729 रुपये प्रति किलोने वाढून 62,136 रुपयांवर ट्रेड करीत होते. दरम्यान, आज मुंबईच्या (Mumbai) सराफा बाजारातही सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. तसेच मुंबईत सोन्याचे दर (24 कॅरेट) 51,330 रुपये प्रति तोळे इतके आहे. तर चांदीचे दर 61,400 रुपये प्रति किलो इतके आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, भारतीय रुपयाने मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) सारख्या देशांतर्गत निर्देशांकांवर सोन्याला नफा मिळवण्यास मदत केली आहे. जागतिक शेअर बाजारातील सततच्या घसरणीने सुरक्षित गुंतवणूक (Secure investment) म्हणून सोन्याची किंमत आणखी मजबूत केली आहे. दरम्यान लग्नसराईत सोन्या चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे, तरी देखील मागणी कमी होताना दिसत नाही. त्याचबरोबर अनेक गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूकही करत आहेत.

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold rate today 23 may 2022 know gold and silver rate today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Water Supply Closed In Pune City | गुरूवारी पुणे शहरातील निम्म्या भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार; शुक्रवारी कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा

 

Bank Holidays June-2022 | जून महिन्यामध्ये 12 दिवस बँका बंद राहणार; सुट्ट्यांची संपूर्ण यादी पहा

 

Best Stocks to Buy | काही काळातच मोठा रिटर्न मिळवण्यासाठी ‘या’ 7 शेयरवर लावू शकता डाव, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला