Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा तेजी; जाणून घ्या आठवडाभराचे बदलते दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात साप्ताहिक वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही (Gold Silver Price Today) किरकोळ वाढ झाली. या व्यापार सप्ताहात सोन्याच्या दरात (Gold Price) प्रति 10 ग्रॅम 354 रुपयांनी वाढ झाली, तर चांदीच्या किमतीत (Silver Price) 8 रुपयांनी किरकोळ वाढ झाली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला 24 कॅरेट सोन्याचा भाव 51,485 होता, जो शुक्रवारपर्यंत 51,839 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तसेच, 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 66,628 रुपयांवरून 66,636 रुपये प्रति किलो झाली आहे. अशी माहिती इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) वेबसाईट नुसार मिळाली आहे.

 

गेल्या एका आठवड्यात सोन्याचे दर – (प्रति 10 ग्रॅम)

4 एप्रिल 2022 – 51,485 रुपये

5 एप्रिल 2022 – 51,451 रुपये

6 एप्रिल 2022 – 51,578 रुपये

7 एप्रिल 2022 – 51,790 रुपये

8 एप्रिल 2022 – 51,839 रुपये

 

गेल्या एका आठवड्यात चांदीचा दर – (प्रति किलो)

4 एप्रिल 2022- 66,628 रुपये

5 एप्रिल 2022- 66,468 रुपये

6 एप्रिल 2022- 65,919 रुपये

7 एप्रिल 2022- 66,019 रुपये

8 एप्रिल 2022- 66,636 रुपये

 

दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत (एप्रिल – फेब्रुवारी) देशाची सोन्याची आयात 73 टक्क्यांनी वाढून $45.1 अब्ज झाली आहे. मागणी जास्त असल्याने सोन्याची आयात वाढली आहे. यासह, मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत सोन्याची आयात $26.11 अब्ज होती.

 

Web Title :- gold silver price this week 4 to 8 april 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा