Gold Price Today : गोल्डच्या दरात घसरणीचा कल कायम, चांदी सुद्धा झाली स्वस्त, जाणून घ्या नव्या किमती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय बाजारात सोमवारी गोल्डच्या किमतीत घसरण नोंदली गेली. दिल्ली सराफा बाजारात 14 डिसेंबर 2020 ला सोन्याच्या भावात 460 रुपये प्रति 10 ग्रॅमची घट झाली होती. तर, चांदीचे दरसुद्धा कमी झाले होते. एक किलोग्रॅम चांदीच्या दरात 629 रुपयांची घट झाली. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 48,831 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 63,098 रुपये प्रति किग्रॅ वर होती. जाणकारांनुसार, अंतरराष्ट्रीय बाजारात घसरणीमुळे भारतात सुद्धा सोने-चांदीचे दर कमी झाले आहेत.

सोन्याचे नवे दर –
दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव 460 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाला. राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्ध सोन्याचा नवा भाव आता 48,371 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. यापूर्वीच्या व्यवहाराच्या सत्रात सोन्याचा भाव 48,831 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर, अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव कमी होऊन 1,830 डॉलर प्रति औंसवर आला आहे.

चांदीचे नवे दर –
सोमवारी चांदीमध्ये सुद्धा घसरण नोंदली गेली. दिल्ली सराफा बाजारात आज चांदीच्या किमतीमध्ये 629 रुपये प्रति किलोग्रॅमची घट झाली. आता तिचा दर 62,469 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे. अंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीचा भाव 23.82 डॉलर प्रति औंसवर बंद झाला.

का झाली धातुंमध्ये घट –
एचडीएफसी सिक्युरिटीजचे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपयात 5 पैशांची मजबूती नोंदली गेली. तर, सोने-चांदीच्या अंतरराष्ट्रीय किंमतीमध्ये घट कायम राहिल्याने याचा परिणाम भारतीय बाजारात दोन्ही किंमती धातुंवर पडला आहे. याशिवाय कोरोना व्हॅक्सीनबाबत आलेल्या पॉझिटिव्ह वृत्तांमुळे सोन्याच्या दरावरील दबाव वाढला आहे.