Gold-Silver Rate Today | नव्या वर्षात सोनं तेजीत तर चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नव्या वर्षात भारतीय वायदे बाजारामध्ये (Futures Market) सोनं पुन्हा (Gold-Silver Rate Today) महागले आहे. तर चांदीच्या दरात घट झाली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सोन्याच्या (Gold-Silver Rate Today) दरात 758 रुपयांची वाढ झाली आहे. गुरुवारी (दि.5) मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 0.19 टक्क्यांवर व्यवहार करत आहेत. तर चांदी 0.8 टक्क्यांनी घसरली आहे. चांदीचा आजचा दर 70 हजार रुपये प्रतिकिलो आहे. मागील व्यवहारात MCX वर सोन्याचे भाव 0.48 टक्क्यांनी तेजीवर बंद झाले होते.

आज फ्युचर्स मार्केटमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर (Gold-Silver Rate Today) कालच्या बंद किमतीवरुन सकाळी साडेनऊ पर्य़ंत 108 रुपयांनी वाढून 55 हजार 875 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज सोन्याचा भाव 55 हजार 794 रुपये इतका झाला आहे. ही किंमत 55,920 रुपयांवर गेली. मात्र नंतर कमी झाली. मागील ट्रेडिंग सत्रात MCX वर सोन्याचा भाव 269 रुपयांनी वाढून 55,799 रुपयांवर बंद झाला.

चांदीच्या दरामध्ये घसरण झाली आहे. आज MCX वर चांदीचा दर 53 रुपयांनी घसरून 69,265 रुपये प्रतिकिलो झाला आहे. चांदीचा दर आज 69,330 रुपयांवर आहे. काल चांदीचे दर 68,180 रुपये होता. परंतु काही वेळाने तो 69,330 रुपये झाला. गेल्या ट्रेडिंग मध्ये एमसीएक्सवर चांदीचे दर 670 रुपयांनी घसरून 69,300 रुपयांवर बंद झाला.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर

सोन्या-चांदीचा दर (Gold Price Today) घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी

Advt.

24 कॅरेट सोने (24 Carat Gold) सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे
शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो.
ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे
माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

Web Title :-  Gold-Silver Rate Today | today gold price gold became expensive in the new year increased by rs 758 in five days what are todays rates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mhada Lottery 2023 | आता म्हाडाचे घर घेणं झालं सोप्प! २१ नाही तर लागणार फक्त एवढीचं कागदपत्रे…

Hypersomnia Symptoms | ८ तास झोपल्यानंतर सुद्धा दिवसा का येते झोप, जांभईपासून अशी होईल सुटका