Gondia Crime | चिमुकलीला ‘Bad Touch’ करणाऱ्या आरोपीला 5 वर्षाचा सश्रम कारावास

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन – Gondia Crime | एका आठ वर्षाच्या मुलीला बॅड टच (Bad Touch) करणाऱ्या आरोपीला बुधवारी (दि.17) जिल्हा न्यायाधीश – 2 व विशेष सत्र न्यायालयाने (District Judge – 2 and Special Sessions Court) पाच वर्षांचा सश्रम कारावास (Rigorous Imprisonment) आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा (Gondia Crime) ठोठावली आहे. नेतलाल चैतराम ठाकरे Netlal Chaitram Thackeray (वय – 48 रा. सिलेगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश – 2 व विशेष सत्र न्यायाधीश एन. बी. लवटे (Judge N. B. Lovete) यांनी ही शिक्षा सुनावली.

 

आरोपीने 16 ऑक्टोबर 2020 मध्ये पीडितेच्या घराला रंग देण्याचे काम घेतले होते. पीडित मुलीचे आई – वडील नोकरी करत असून ते कामावर गेले होते. त्यावेळी घरात 8 वर्षाची पीडित मुलगी आणि तिची आजी घरात होते. पीडित मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिच्यासोबत वारंवार लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) करण्याचे हेतूने तिच्या अंगाला स्पर्श केला.

 

पीडित मुलीने तिच्या आई – वडीलांना याबाबत सांगितले. यावरुन आईने आरोपीविरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात (Gondia Rural Police Station) फिर्याद दिली होती. त्यावरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी 354, 354 (अ), बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत कलम 10 अन्वये गुन्हा (FIR) दाखल केला. (Gondia Crime)

 

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक आर. टी. धारवडे (Police Inspector R.T. Dharwad) यांनी केला.
आरोपीविरुद्ध दोष सिद्ध करण्यासाठी सरकारी वकील कृष्णा डी. पारधी (Government Advocate Krishna D. Pardhi) यांनी सहा साक्षीदारांची साक्ष घेतली.
आरोपीचे वकील आणि सरकारी वकील यांचा युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एन. बी. लवटे यांनी सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपीला पाच वर्षाचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

 

Web Title : –  Gondia Crime | 5 years rigorous imprisonment for the accused who gave Bad Touch to a child

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा