खुशखबर ! ७ वा वेतन आयोग, ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारात १० हजार रूपयांची वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठी पगार वाढ मिळणार आहे. सरकारने या आधीच १ जुलै २०१९ पासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ केली आहे. आता कर्मचाऱ्यांचा पगार ४ ते ५ % नी वाढणार आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार ७२० रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या पदभारानुसार ही वाढ होणार आहे.

Consumer Price Index-AICPI चा डेटा येईल तेव्हा DA किती वाढणार हे स्पष्ट होईल. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा DA १२ % आहे. सरकारनं ४ टक्के वाढवला की तो १६ % होईल.सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एका पातळीवर वाढतो. या वाढीनंतर लेव्हल १ पासून लेव्हल १८ पर्यंतच्या अधिकाऱ्यांचा पगार सारख्या पातळीने वाढणार आहे.

७व्या वेतन आयोगाचा फायदा

७व्या वेतन आयोगामुळे लेव्हल १ स्तराच्या अधिकाऱ्यांचा मूळ पगार १८ हजार रुपये आहे. तर १८व्या लेव्हलच्या अधिकाऱ्यांचा पगार २.५ लाख रुपये दर महिना आहे.

काय आहे महागाई भत्ता?

महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाचा भाग असतो. हा कर्मचाऱ्यांच्या काॅस्ट ऑफ लिव्हिंग (COL) आणि कंझ्युमर प्राइस इंडेक्स (CPI)शी संबंधित आहे. वेळोवेळी त्याचं विश्लेषण केलं जातं. हा बेसिक पेच्या परसेंटेजवर मोजला जातो. कर्मचाऱ्यांबरोबर निवृत्तीधारकांनाही १२ % डीए मिळतो.

 

आरोग्यविषयक वृत्त