खुशखबर ! शेतकर्‍यांना मिळणार 4000 रुपये; 30 जूनच्या पूर्वी येथे करावा लागेल अर्ज, जाणून घ्या पूर्ण डिटेल

नवी दिल्ली : देशभरातील शेतकर्‍यांसाठी चांगली बातमी आहे. पंतप्रधान किसान योजनेतून (pm kisan)  देशभरातील शेतकर्‍यांसाठी 4000 रुपये मिळवण्याची सुवर्ण संधी आली आहे. नुकताच पीएम किसान योजनेंतर्गत (pm kisan) शेतकर्‍यांच्या खात्यात 2,000 रुपयांचा हप्ता पाठवण्यात आला आहे. योजनेत आतापर्यंत 9 कोटीपेक्षा जास्त शेतकर्‍यांनी रजिस्ट्रेशन केले आहे. पीएम किसान योजनेचा हेतू देशातील शेतकर्‍यांना आर्थिक मदत देणे हा आहे.

नवीन शेतकरी घेऊ शकतात लाभ
पीएम किसान योजने अंतर्गत आता नवीन शेतकरी लाभ घेऊ शकतात. सोप्या शब्दात सांगायचे तर तुम्ही जर शेतकरी असाल आणि सर्व आवश्यकता पूर्ण करत असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. घरबसल्या याचा लाभ घेऊ शकता. यासाठी अधिकृत वेबसाइट – https://pmkisan.gov.in/ वर रजिस्ट्रेशन करू शकता.

अनेक शेतकरी असे सुद्धा असे आहे ज्यांना 2000 रुपयांची ही रक्कम मिळालेली नाही, कारण त्यांनी योजनेत रजिस्ट्रेशन केले नव्हते. अशावेळी आता शेतकरी 30 जूनपर्यंत रजिस्ट्रेशन करूशकतात. यास मंजूरी मिळाली तर एप्रिल-जुलैचा हप्ता जुलैमध्ये मिळेल आणि ऑगस्टचा नवीन हप्ता सुद्धा अकाऊंटमध्ये येईल. म्हणजे दोन हप्त्यांचा लाभ मिळू शकतो.

जाणून घ्या कधीपर्यंत हप्ता?
जर एखाद्या शेतकर्‍याने जूनमध्ये नोंदणी केली तर त्यास योजनेचा पहिला हप्ता (8वा हप्ता) जुलैमध्ये मिळेल. त्यांना पुढील हप्ता सुद्धा मिळेल जो सरकार सामान्यपणे ऑगस्ट महिन्यात पाठवते. याचा अर्थ असा आहे की, शेतकर्‍याला पीएम किसान योजनेचा दुहेरी लाभ मिळेल. योजनेसाठी रजिस्ट्रेशन करताच त्यांना न्हें 4,000 रुपये मिळतील.

 

Also Read This : 

 

BMC Election 2021 : निवडणूक पुढे ढकलली जाणार ? केंद्रीय निवडणूक आयोगाची अधिकाऱ्यांसोबत बैठक, लवकरच होणार निर्णय

 

Walking Tips : चुकूनही चालताना करु नका ‘ह्या’ चुका, आरोग्याचे होऊ शकते मोठे नुकसान

 

आमदार गोपीचंद पडळकरांचा इशारा, म्हणाले – ’31 मेपासून पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचा लढा उभारणार’

 

महिलांनो, फिटनेसच्या नादात ‘हे’ करू नका, जाणून घ्या

 

15 लाखाच्या कर्जावर 54 लाखांची पठाणी वसुली, सावकाराला अटक !

 

 

‘हे’ पदार्थ मुलांना दररोज द्या, मेंदू संगणकापेक्षा वेगवान चालेल