आमदार गोपीचंद पडळकरांचा इशारा, म्हणाले – ’31 मेपासून पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचा लढा उभारणार’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची सोमवारी (दि.31) जयंती आहे. या दिवशी चौंडी या त्यांच्या जन्मगावापासून पुन्हा एकदा आरक्षणाचा जागर करणार आहोत. त्यातून महाविकास आघाडी सरकारला समाजाची ताकद दाखविणार आहोत, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी दिला आहे. चौंडी येथे जाऊन अभिवादन करणार आहेत. त्याचे लाइव्ह प्रक्षेपण सोशल मीडियाद्वारे केले जाणार आहे. यावेळी समाजबांधवांनी घरातच थांबून समाजाची वेशभूषा परिधान करून जयंती साजरी करावी असे आवाहन पडळकर यांनी केले आहे. आमदार पडळकर (MLA Gopichand Padalkar)
यांनी धनगर समाजाच्या (dhangar reservation) आरक्षणासाठी 2017-18 राज्यभर लढा उभारला होता. समाजाचे अनेक लक्षवेधी मेळावे घेऊन त्यांनी जनजागृती केली होती.

आमदार पडळकर म्हणाले, तत्‍कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील धनगड आणि धनगर समाज एकच असल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करून समाजाच्या विकासासाठी 1 हजार कोटींची तरतूद केली होती. त्यानंतर आलेल्या ठाकरे सरकारने तरतूद केलेल्या 1 हजार कोटी रुपयांपैकी एक रुपयाही निधी समाजासाठी खर्च केला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा आम्ही धनगर आरक्षणाचा जागर करणार असल्याचे ते म्हणाले.

 

Also Read This : 

 

रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर ‘या’ फळाचं सेवन करा, इतर देखील फायदे होतील

 

जयंत पाटलांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘….म्हणून राज्यात अधिवेशन घेत नाही’

 

गुळासह ‘या’ गोष्टींचं करा सेवन, आजार कायमचे राहतील दूर, जाणून घ्या

 

‘शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा काय केलं ?’, पवार-संभजीराजेंच्या भेटीवरुन खा. नारायण राणेंचा सवाल

आवळ्याच्या रसामध्ये लपलेले आहेत आरोग्य रहस्य, जाणून घ्या