Paytm पेमेंट्स बँक ग्राहकांसाठी चांगली बातमी ! आता फिक्‍स्‍ड डिपॉजिटसाठी मिळणार 2 पर्याय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डिजिटल पेमेंट सुविधा देणारी कंपनी पेटीएम आपल्या पेमेंट बँक (PPBL) ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) मिळविण्यासाठी दोन पर्याय देत आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेने ग्राहकांना एफडीची सुविधा देण्यासाठी आता इंडसइंड बँकनंतर सूर्य्योदय स्मॉल फायनान्स बँकेबरोबर भागीदारी केली आहे. आता पीपीबीएल ग्राहक दोन्ही आवडत्या बँकेच्या एफटी दर आणि इतर अटींवर पेटीएम पेमेंट्स बँकेसोबत निश्चित ठेवी करू शकतील.

पेटीएम पेमेंट्स बँक सध्या इंडसइंड बँकेसमवेत किमान 100 रुपयांच्या ठेवीसह ग्राहकांना एफडी सुविधा देत आहे. आता एसएसएफबीबरोबर नव्या भागीदारीमुळे पीपीबीएल मल्टी-पार्टनर एफडी सर्विस देणारी देशातील पहिली पेमेंट बँक बनली आहे. हे ग्राहकांना दोन भागीदार बँकांपैकी एक निवडण्याची परवानगी देईल. पीपीबीएलने म्हटले आहे की, ग्राहक आता एफडीसाठी दोन्ही भागीदार बँकांच्या ऑफरची तुलना करू शकतील. यामुळे त्यांना किमान ठेव, व्याज दर, एफडी कालावधीनुसार चांगले निवडण्याची संधी मिळेल.

पीपीबीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश गुप्ता म्हणाले की, आम्ही खातेदारांना एफडीसाठी फ्लेक्सिबिलिटी देण्यासंदर्भात लघु वित्त बँकेबरोबर भागीदारी केली आहे. ग्राहक त्यांच्या सोयीसाठी आणि लाभाची तुलना करुन त्यांची पसंतीची पार्टनर बँक निवडू शकतात. दरम्यान, पीपीबीएल वेळेपूर्वी एफडी तोडल्यावर ग्राहकांकडून कोणताही दंड घेत नाही. सूर्यदय स्मॉल फायनान्स बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भास्कर बाबू म्हणतात की, एक लहान फायनान्स बँक म्हणून आमचे लक्ष ग्राहकांना चांगला अनुभवासह नाविन्यपूर्ण उत्पादने आणि समाधान देण्यावर आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेबरोबरची भागीदारी ग्राहकांना अधिक बचत करण्यास सक्षम करेल.