रिसर्चमध्ये खुलासा ! रक्त चंदनाच्या बियांमुळं होवु शकतो स्नाच्या कॅन्सरचा उपचार, जाणून घ्या

पाटणा : वृत्तसंस्था – रक्त चंदनाच्या बीमध्ये स्तन कर्करोगाविरोधी घटक आढळतात. जगातील पहिल्या आणि बिहारमधील नवीन संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. पटना येथील अनुग्रह नारायण महाविद्यालयाचा पीएचडीचा विद्यार्थी विवेक अखौरीने महावीर कर्करोग संस्था आणि संशोधन केंद्राद्वारे केलेल्या स्तन कर्करोगाशी संबंधित संशोधनात हे समोर आले आहे.

अभ्यास प्रक्रियेत समोर आली नवीन तथ्य
अभ्यासामध्ये विवेक अखौरीने चार्ल्स फॉस्टर उंदीरात कर्करोग रासायनिक डीएमबीए प्रेरित करून ब्रेस्ट ट्यूमरचे मॉडेल विकसित केले. ब्रेस्ट ट्यूमरच्या विकासानंतर ५ आठवड्यांसाठी उंदराचा लाल रक्त चंदनाच्या बीसह उपचार केला गेला. ट्यूमरच्या प्रमाणात लक्षणीय घट दिसून आली आणि हळूहळू ते संपले. लाल रक्त चंदनाच्या बियाण्याद्वारे केलेला जगातील हा पहिला अभ्यास आहे. हे संशोधन २२ ऑगस्ट २०२० रोजी सेज जर्नल ऑफ ब्रेस्ट कॅन्सर: बेसिक अँड क्लिनिकल रिसर्च (यूएसए) मध्ये देखील प्रकाशित केले गेले आहे.

ब्रेस्ट कॅन्सरचे होऊ शकते निदान
ग्लोबोकॉन २०१८ या जागतिक स्तरावरील कर्करोग संस्थेच्या म्हणण्यानुसार, आता स्तन कर्करोगाचे निदान केले जाऊ शकते. ब्रेस्ट कॅन्सर भारतात स्त्रियांमध्ये कर्करोगाशी संबंधित मृत्यूचे सर्वात सामान्य कारण आहे. महिलांमध्ये सर्व नवीन कर्करोगाच्या प्रकरणांत अंदाजे मृत्यू दर २७.७ टक्के (१,६२,४६८) आहे, तर २०१८ मध्ये २३.४५ टक्के (८७,०९०) महिलांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता.

बिहारच्या पाटणामधील महावीर कर्करोग संस्थेतही २५ हजारच्या एकूण कर्करोगाच्या प्रकारणांपैकी २३.५ (५,८७५) ब्रेस्ट कॅन्सरची आहेत. स्तन कर्करोगाच्या एटिओलॉजीमध्ये वय, वंशानुगत घटक, पुनरुत्पादक घटक, एस्ट्रोजनसाठी दीर्घकाळ संपर्क, स्तनपानाची कमतरता आणि जीवनशैलीशी संबंधित इतर घटकांचा समावेश आहे. या जोखीम घटकांव्यतिरिक्त काही पर्यावरणीय घटकही आहेत, जे स्तन कर्करोगाच्या वाढीस कारणीभूत ठरतात.

या अभ्यास समूहात महावीर कर्करोग संस्थेचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अरुण कुमार आणि मार्गदर्शक डॉ. मनोरमा कुमारी यांचा समावेश होता. अभ्यासात डॉ. अरुण यांनी सांगितले की, त्यांनी झारखंडमध्ये चंदनाचे बी पाहिले होते आणि ते गोळा करून आणले होते. या संशोधनात पूर्णपणे नवीन गोष्ट समोर आली आहे.