कामाची बातमी ! बंद पडलेल्या LIC पॉलिसीचे ‘या’ पध्दतीनं करा नुतनीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा निगमने (LIC) आपल्या ग्राहकांना एक भेट दिली आहे. ज्यांची पॉलिसी पेेमेंट न केल्याने बंद पडली आहे, अशा ग्राहकांना ती पुन्हा चालू करण्यासाठी ग्राहकांना संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी LIC ने एक मोहिम आखली असून त्यानुसार पॉलिसी पुन्हा सुरु करता येणार आहे. 7 जानेवारी ते 6 मार्च या दरम्यान ही मोहीम राबवण्यात येणार आहे. LIC ने यापूर्वी देखील 10 ऑगस्ट ते 9 ऑक्टोबर 2020 या दरम्यान ही योजना राबविली होती.

काय आहे मोहीम?

एखादयाची पॉलिसी काही कारणामुळे बंद पडली असेल तर त्या पॉलिसीधारकांना आणखी एक संधी या योजनेत मिळणार आहे. अर्थात त्यासाठी काही अटींचे त्यांना पालन करावे लागणार आहे. LIC ने या मोहिमेसाठी खास 1,526 कार्यालयांची निवड केली आहे. त्या कार्यालयामध्ये ही पॉलिसी पुन्हा सुरू करता येणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही मेडिकल टेस्टची गरज नसेल.

काय आहेत अटी?

LIC च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांची पॉलिसी पेमेंट न केल्यामुळे गेल्या 5 वर्षात बंद पडली आहे, अशा पॉलिसीधाराकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर त्यांची तब्येत लक्षात घेऊन काही सवलती देखील दिल्या जाणार आहेत. मात्र Covid-19 संबधीच्या काही प्रश्नांना त्यांना उत्तरं द्यावी लागणार आहेत.

काय आहेत, नव्या योजनेची वैशिष्ट्य

या योजनेनुसार पॉलिसीधारकांना लेट फीमध्ये 20 टक्के किंवा 2 हजार रुपयांची सुट मिळणार आहे. 1 लाख ते 30 लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक प्रीमियम पॉलिसीवर 25 टक्के सुट असेल. प्रीमियम भरण्याच्या काळात बंद पॉलिसीच या योजनेनुसार सुरु करता येणार आहे. त्याचबरोबर ही पॉलिसी सुरु करण्यासाठी अंतिम तारीख देखील दिली जाणार आहे. ‘विमा कव्हर सुरु करण्यासाठी जुनी पॉलिसी पुन्हा सुरु करणे हा एक चांगला पर्याय असल्याचे मत मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. स्वत:ला आणि कुटुंबीयांना जीवन कवच देण्यासाठी ही एक चांगली योजना असल्याचे त्यांनी सांगितले आहे. LIC चे देशभरात सध्या 30 कोटी ग्राहक आहेत.