Facebook च्या पासवर्डचे ‘डिटेल’ चोरणाऱ्या ‘या’ 25 Apps ला Google नं केलं ‘बॅन’, तुमच्या मोबाईल मधून तात्काळ करा ‘डिलीट’

नवी दिल्ली : गुगल प्ले स्टोरने सुमारे 25 अँड्रॉइड अ‍ॅप्स हटवले आहेत. हे अ‍ॅप्स यूजर्सच्या फेसबुक लॉगइन डिटेल्स चोरत होते. याबाबत सायबर सिक्युरिटी फर्म एविनाने गुगलला अलर्ट केले, ज्यानंतर गुगलने प्ले स्टोरवरून हे अ‍ॅप्स हटवले. हे अ‍ॅप्स एका मालवेयरसोबत येतात, जो फेसबुक लॉगइन डिटेल्सचा रेकॉर्ड ठेवत होता. सिक्युरिटीचा विचार करता हे अ‍ॅप्स खुप धोकादायक असल्याचे आढळले आहे. हे 25 अ‍ॅप्स सुमारे 2 मिलियन (20 लाख) वेळा डाऊनलोड केले गेले आहेत. तुम्ही सुद्धा या 25 अ‍ॅप्समधील एखाद्या अ‍ॅपचा वापर करत आहात तर सावध व्हा. जाणून घेवूयात कोणते आहेत हे 25 अ‍ॅप…

हे 25 अ‍ॅप्स केले बॅन –

1. सुपर वॉलपेपर्स फ्लॅशलाइट्स (Super Wallpapers Flashlight). 5 लाख डाऊनलोड.

2. पॅडनटेफ (Padenatef). 5 लाखांपेक्षा जास्त डाऊनलोड.

3. वॉलपेपर लेवल (Wallpaper Level). 1 लाखपेक्षा जास्त डाऊनलोड.

4. कॉन्टर लेवल वॉलपेपर (Contour level wallpaper). 1 लाखपेक्षा जास्त डाऊनलोड.

5. आयप्लेयर आणि आयवॉलपेपर (Iplayer & iwallpaper). 1 लाखपेक्षा जास्त डाऊनलोड.

6. व्हिडिओ मेकर (Video maker). 1 लाखपेक्षा जास्त डाऊनलोड.

7. कलर वॉलपेपर्स (Color Wallpapers). एक लाखपेक्षा जास्त डाऊनलोड.

8. पेडोमीटर (Pedometer). 1 लाखापेक्षा जास्त डाऊनलोड.

9. पॉवरफुल फ्लॅशलाइट (Powerful Flashlight). 1 लाखपेक्षा जास्त डाऊनलोड.

10. सुपर ब्राइट फ्लॅशलाइट (Super Bright Flashlight).

11. सुपर फ्लॅशलाइट (Super Flashlight) 1 लाखपेक्षा जास्त डाऊनलोड.

12. सॉलिटायर गेम (Solitaire game). 1 पेक्षा जास्त डाऊनलोड.

13. अक्युरेट स्कॅनिंग ऑफ क्यूआर कोड (Accurate scanning of QR code) 50 हजारपेक्षा जास्त डाऊनलोड.

14. क्लासिक कार्ड गेम (Classic card game). 50 हजार डाऊनलोड.

15. जंक फाइल क्लिनिंग (Junk file cleaning). 50 हजार डाऊनलोड.

16. सिंथेटिक जेड (Synthetic Z). 50 हजार डाऊनलोड.

17. फाइल मॅनेजर (File Manager). 50 हजार डाऊनलोड.

18. कम्पोझिट झेड (Composite Z). 50 हजार डाऊनलोड.

19. स्क्रीनशॉट कॅपचर (Screenshot capture). 10 हजार डाऊनलोड.

20. डेली होरोस्कोप वॉल पेपर्स (Daily Horoscope Wallpapers). 10 हजार डाऊनलोड.

21. वॉक्सिया रीडर (Wuxia Reader). 10 हजार डाऊनलोड.

22. प्लस वेदर (Plus Weather). 10 हजार डाऊनलोड.

23. एनाइम लाइव्ह वॉलपेपर (Anime Live Wallpaper). सुमारे 100 डाऊनलोड.

24. आय हेल्थ स्टेप काऊंटर (iHealth step counter).

25. कॉम.टाइप.फिक्शन (Com type fiction)