Google Maps Toll Feature | पर्यटकांसाठी मोठी खुशखबर ! ट्रिपच्या आधीच गूगल मॅप्स देणार ‘Toll -Free’ रस्त्याची माहिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Google Maps Toll Feature | युजर्सना पैसे वाचवण्यास मदत करण्यासाठी गूगल मॅप्स (Google Maps Toll Feature) मध्ये लवकरच एक नवं फिचर (New Feature) येणार आहे. तर कंपनीने Toll Feature ची घोषणा भारतासह (India) निवडक देशांत केली आहे. या फिचरमुळे युजर्सना रस्त्यातील टोलच्या चार्जेसची माहिती मिळणार आहे. यामुळे युजर्स टोल नसलेल्या अथवा कमी टोल असलेल्या रस्त्याची निवड करू शकणार आहे. तुम्ही गुगल मॅपवर (Google Maps) एखादं लोकेशन टाकून ट्रिप सुरु केली की त्या रस्त्यावरील सगळे टोल आणि त्यांच्या चार्जेसबाबत (Charges) माहिती मिळणार आहे.

 

गूगल मॅप्सचे हे नवीन फिचर फक्त निवडक देशांत प्रथम सुरु केले जाणार आहे.
महत्वाचे म्हणजे त्यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. भारताबरोबरच इंडोनेशिया (Indonesia), जपान (Japan) आणि अमेरिकेतील (America) युजर्सना एप्रिल 2022 च्या अखेरपर्यंत हे फिचर उपलब्ध होईल.
लोकल टोलिंग ऑफिसरकडून (Local Tolling Officer) मिळालेली माहिती गुगल मॅप्सवर दाखवण्यात येणार आहे.

 

दरम्यान, टोल प्राईस फीचरमध्ये युजर्सना त्यांच्या रूटवरील टोलची बेरीज करून मिळणार आहे.
यामध्ये टोल पास, आठवड्याचा दिवस, वेळ सारख्या विविध गोष्टींचेही सहाय्य घेतले जाणार आहे.
गूगल मॅप्सवर 2 हजार पेक्षा अधिक टोल असलेल्या रस्त्यांची माहिती उपलब्ध होणार आहे.
जर युजर्सना टोलचे पैसे वाचवायचे असतील, तर ते गुगल मॅपवर टोल – फ्री रस्त्याची मागणी करू शकतात.
यासाठी युजरकडून अ‍ॅपच्या वरच्या बाजूला असलेल्या २ डॉट्सवर क्लिक करू शकतात तसेच, उपलब्ध असलेला पर्यायी मार्ग शोधण्यासाठी Avoid tolls चे पर्याय देखील निवडू शकणार आहेत.

 

Web Title :- google maps toll feature will show toll free route before trip coming soon

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा