Google चा पहिला अंतरिम रिपोर्ट जारी; सांगितले – ‘27,700 यूजरच्या तक्रारीनंतर एप्रिलमध्ये हटवले 59000 कंटेन्ट’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – नवीन आयटी नियमांनुसार भारतात गुगल (Google) ने सर्वप्रथम आपला अंतरिम रिपोर्ट जारी केला आहे. यामध्ये म्हटले आहे की, एप्रिलमध्ये यूजर्सच्या तक्रारीनंतर प्लॅटफार्मवरून कंटेन्ट हटवण्यात आले. 26 मेपासून लागू नवीन नियमात आदेश देण्यात आला आहे की, प्रत्येक सोशल मीडिया कंपनीला दर महिन्याला वेळोवळी अंतरिम रिपोर्ट प्रकाशित करायचा आहे.Google | received 27700 user complaints removed over 59000 content pieces in apr in india says google common man issues

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

गुगल (Google) कडे यावर्षी एप्रिलमध्ये भारता 27,700 तक्रारी आल्या. भारतात गुगलच्या स्थानिक कायदे आणि यूजर्सच्या व्यक्तीगत अधिकारांच्या उल्लंघनाबाबत या तक्रारी होत्या ज्यामुळे 59,350 कंटेन्ट हटवण्यात आला. ही माहिती कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या मासिक ट्रान्स्परन्सी रिपोर्टमध्ये दिली आहे.

रिपोर्टनुसार 26,707 (96.2 टक्के) तक्रारी कॉपीराईट, 357 (1.3 टक्के) ट्रेडमार्क आणि 275 मानहानी प्रकरणाच्या होत्या. याशिवाय कायदेशीर (272), बनावट (114) आणि फसवणुकीच्या (37) च्या तक्रारी होत्या. आम्ही त्या कंटेन्टची आमच्या कम्युनिटी गाईडलाईननुसार तपासणी केली.
यानंतरच तो हटवण्यात आला.

मोठ्या डिजिटल प्लॅटफार्ममध्ये गुगल पहिला आहे ज्याने 26 मेरोजी लागू आयटी नियमांनुसार आपला मासिक ट्रान्स्परन्सी रिपोर्ट दिला आहे.
कंपनीच्या प्रवक्त्याने बुधवारी म्हटले की, 2010 पासूनच्या सर्व प्रकरणांचा आमच्या या ट्रान्स्परन्सी रिपोर्टमध्ये समावेश केला आहे.

ही पहिली वेळ आहे जेव्हा आम्ही भारताच्या यानियमानुसार मासिक ट्रान्स्परन्सी रिपोर्ट जारी केला आहे आणि पुढे सुद्धा अशी माहिती भारतात प्रकाशित करत राहू.

Web Title : Google | received 27700 user complaints removed
over 59000 content pieces in apr in india says google common man issues

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

हे देखील वाचा

Corona side effects | कोरोना संसर्गाचा आणखी एक साईड इफेक्ट !
आता शौचातून ब्लिडिंगची 5 प्रकरणे आली समोर, एकाचा मृत्यू

8 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पोलीस ‘युनिट’मध्ये कार्यरत असणाऱ्या PSI, API,
पोलीस निरीक्षकाची इतर ठिकाणी होणार बदली

Form 16 काय आहे आणि तो कुठे उपयोगी पडतो, जाणून घ्या याच्याशी संबंधीत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर