Google वर कसलाही शोध घेण्यासाठी उपयोगी पडतील ‘या’ 9 पद्धती, मिळेल ‘तात्काळ’ रिझल्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Google | जेव्हा तुम्ही एखाद्या विशेष गोष्टीचा शोध घेत असता, तेव्हा फिल्टर टॅब तुमच्या सर्चला आणखी परिणामकारक करू शकतो. जर तुम्ही तुमच्या जवळपासचे कॅफे, मॉल किंवा पार्क शोधत असाल तर ते तुम्हाला थेट त्या रिझल्टपर्यंत पोहचवू शकतात. हे अचूक निकाल तुमच्या समोर ठेवतात. (Google)

1. कोटेशन मार्क (” “) चा वापर करा
जेव्हा तुम्ही अनेक शब्द एकाच वेळी शोधत असाल तर गुगल तुमच्या समोर कोणत्याही क्रमाने रिझल्ट दाखवू शकतो. यासाठी अनेक शब्दांसह जर कोटेशन मार्कचा वापर केला तर तुम्हाला अचूक रिझल्ट मिळतो.

 

2. विशेष साईट शोधण्यासाठी कोलन
Google तुम्हाला केवळ एक विशेष वेबसाइटसंबंधीत तत्व शोधण्याची परवानगी देते. कोलनचा वापर करून तुम्हाला ती विशेष वेबसाइट मिळेल. उदाहाणार्थ ‘साईट : xyz.com

 

3. तारांकित वाईल्डकार्ड (*)
जेव्हा तुमच्याकडे काही अचूक शोधायचे असते परंतु तुमच्याकडे योग्य शब्द नसतात तेव्हा त्या शब्दांच्या ठिकाण * टाकू शकता. ज्यानंतर Google तुमच्यासाठी रिकाम्या जागा भरेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही टायटनवर एनीमी अटॅकचा शोध घेत असाल, परंतु लक्षात येत नसेल की अचूक नाव टायटनवर हल्ला किंवा टायटनचा हल्ला, तर केवळ अटॅक * टायटन चा सर्च करू शकता, गुगल तुमची मदत करेल.

4. क्विक कॅलक्युलेटर आणि करन्सी कन्व्हर्जन
Google चा सर्च बार कॅलक्युलेटरचे सुद्धा काम करतो. जेव्हा तुम्हाला ताबडतोब कॅलक्युलेशनचा निकाल हवा असतो आणि फोन किंवा कॅलक्युलेटर नसते जेव्हा तुम्ही केवळ Google मध्ये थेट सर्च करून उत्तर मिळवू शकता. याशिवाय चलन एक्सचेंज दर सुद्धा जाणून घेऊ शकतात. उदाहरणार्थ, Google “37.99 USD in”


5. Google कडून वेळ आणि सूर्योदय आणि सुर्यास्ताची माहिती
Google तुमच्या शहरासह प्रत्येक शहराचा टाइमझोनमध्ये वेळ शोधते. यासाठी जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की, परदेशात एखाद्या विशेष शहरात, वेळ काय आहे, तर तुम्हाला केवळ Google वर वेळ (शहराचे नाव) सर्च करावे लागेल आणि तुम्हाला त्या भागाची स्थानिक वेळ समजेल. ताबडतोब निकालासाठी सूर्योदय (शहराचे नाव) किंवा सूर्यास्त (शहराचे नाव) शोध घेऊ शकता.

 

6. विशेष फाईलचा शोध
Google विशिष्ट फाईलचा शोध घेते. जेव्हा तुम्ही विशेष प्रकारचे जेपीईजे छायाचित्र, पीडीएफ फाइल किंवा त्या प्रकारच्या कोणत्याही वस्तू लवकर शोधायच्या असतील तर त्या फाईलचे नाव आणि प्रकार लिहून नाव शोधू शकता.

 

7. टायमर/स्टॉपवॉच सेट करा
Google तुम्हाला थेट फोन किंवा कम्प्युटरमध्ये एक नवीन टॅबने टायमर किंवा स्टॉपवॉच सेट करून देतो.
टायमर सुरू करण्यासाठी टायमर 7 मिनिट सारखे काही शोधा. टायमर बॉक्समध्ये, स्टॉपवॉच फंक्शन सुद्धा मिळवू शकता.

 

8. गुगलला आपला आयपी अ‍ॅड्रेस विचारा
जरी तुम्हाला माहिती नसेल तरी गुगलला तुमच्या डिव्हाईसचा आयपी अ‍ॅड्रेस माहित असतो.
सध्या तुम्ही ज्या डिव्हाईसचा वापर करत आहात त्याचा आयपी अ‍ॅड्रेस शोधण्यासाठी केवळ Google उघडा आणि माझा आयपी काय आहे? सर्च करा.

9. रिव्हर्स इमेज सर्च
आपली छायाचित्रे शोधण्यासाठी गुगलचा वापर करणे खुप चांगले आहे.
एखाद्या छायाचित्राने त्याच्या मूळ स्त्रोतापर्यत पोहचण्यासाठी गुगल मदत करते.
तेच छायाचित्र उच्च रिझॉल्यूशन किंवा समान प्रतिमेत शोधू शकता.
यासाठी सर्वप्रथम डेडिकेटेड गुगल इमेजेस होमपेजवर जा.
गुगल पेजवर जाऊन वर डाव्या कोपर्‍यात इमेज बटनवर क्लिक करून असे करू शकता.

 

Web Title :- Google | tips and tricks these 10 tricks will work in finding anything on google will make your result even faster

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्याच्या कोंढव्यातील ‘त्या’ बंगल्यावर पोलिसांचा छापा ! 13 पोकर टेबल, 30 पत्त्याचे कॅटचे बॉक्स, परकीय चलन, विदेशी दारू अन् 46.76 लाख रोख असा 58 लाखाचा ऐवज जप्त

 

Pune Crime | पुण्याच्या तळजाई जंगलात 22 वर्षीय तरूणीला दारू पाजून बलात्कार करणार्‍या शुभम शिंदेची येरवडयात रवानगी

 

Tejaswini Pandit | तेजस्विनी पंडितचा बोल्ड अवतार… ‘अनुराधा’ या वेबसिरिजचं पोस्टर झालं तुफान व्हायरल…