Pune Crime | पुण्याच्या तळजाई जंगलात 22 वर्षीय तरूणीला दारू पाजून बलात्कार करणार्‍या शुभम शिंदेची येरवडयात रवानगी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मित्रानेच वाढदिवस असल्याचे सांगत मित्रासह 22 वर्षीय तरुणीला तळजाई (taljai tekdi) येथील जंगलात नेऊन त्याठिकाणी दारु पाजून बलात्कार (Rape in Pune) केल्याप्रकरणात सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police) अटक केलेल्या शुभम सिताराम शिंदे Shubham Sitaram Shinde (वय 19,रा.धनकवडी) याची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी पहिल्याच कारणाने पुन्हा पोलीस कोठडी मागितली जात आहे. त्याच्याकडे अधिक तपास करण्याची गरज नसल्याचा युक्तीवाद अ‍ॅड. जितेंद्र सावंत (Adv. Jitendra Sawant) आणि अ‍ॅड. अभिजित सोलनकर (Adv. Abhijeet Solankar) यांनी केला. (Pune Crime)

22 वर्षीय तरूणीने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. जितेंद्र सावंत, अ‍ॅड. अभिजित सोलनकर, अ‍ॅड. हितेश सोनार (Adv Hitesh Sonar), अ‍ॅड. अक्षय कदम (Adv Akshay Kadam) आणि अ‍ॅड. अक्षय वाडकर (Adv. Akshay Wadkar) यांनी बाजू मांडली. शिंदे याने पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याचे सुमारास वाढदिवस असल्याचे सांगत पार्टी करण्यासाठी तळजाई शेवटचा बसस्टॉप याठिकाणी तिला बोलाविले. त्यानंतर एका मित्रासह तिघे तळजाई येथील जंगलात दारु पिण्यासाठी गेले. त्याठिकाणी दारु पिल्यानंतर तरुणीला थंडी वाजू लागल्याने ती त्याचठिकाणी बाजूला झोपली होती. त्यावेळी आरोपी शिंदे याने तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत (Pune Crime) म्हटले आहे. याबाबत पुढील तपास सहकारनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई (Senior Police Inspector Swati Desai) करत आहे.

 

Web Title :- Pune Crime | Shubham Shinde, who raped a 22 year old girl in Pune’s Taljai forest under the influence of alcohol, send to Yerwada jail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ileana D’Cruz | इलियाननं शेअर केले बोल्ड फोटो, कॅप्शनमध्ये हेटर्ससाठी लिहिला खास संदेश…

Tejaswini Pandit | तेजस्विनी पंडितचा बोल्ड अवतार… ‘अनुराधा’ या वेबसिरिजचं पोस्टर झालं तुफान व्हायरल…

कामाची गोष्ट ! IRCTC वर ‘या’ पध्दतीनं तात्काळ बुक करा तिकीट, कधीही मिळणार नाही वेटिंग; जाणून घ्या पद्धत

PIB Fact Check | सरकारकडून मिळतंय आधार कार्डवर स्वस्तात कर्ज? जाणून घ्या ‘सत्य’

Tuljapur Accident | तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या क्रूझर गाडीला भीषण अपघात; एकजण जागीच ठार, 11 गंभीर जखमी

Multibagger Stock | मल्टीबॅगर स्टॉक्समध्ये मोठा परतावा ! 10 रुपयांचा शेअर पोहोचला 338 रुपयांवर, 6 महिन्यात 1 लाखाचे झाले 32 लाख, जाणून घ्या