Google भारतातील रेल्वे स्टेशनवरील ‘फ्री-वायफाय’ सेवा करणार बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात रेल्वे स्टेशनवर देत असलेली फ्री वाय फाय सेवा गुगल येत्या काळात बंद करणार आहे. गुगलने आज (सोमवारी) ही माहिती दिली की ते आपला ‘गुगल स्टेशन प्रोग्राम’ सेवा बंद करणार आहे. भारतातील अनेक स्टेशनवर मागील 5 वर्ष मोफत इंटरनेट वापरण्यासाठी गुगलने ही सेवा सुरु केली होती.

नेक्स्ट बिलियन यूजर्सचे व्हाईस प्रेसिटंड सेनगुप्ता यांनी आपल्या ब्लॉगद्वारे ही माहिती दिली. आम्ही पुढील योजनेचा विचार करत आहोत, हे मात्र स्पष्ट आहे की 5 वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या सहज उपलब्ध होणाऱ्या आणि मोफत असलेल्या सेवेचा मोठा लाभ झाला. आता मोबाइल डाटा प्लॅन खूप स्वस्त झाला आहे आणि जगभरात मोबाइल कनेक्टिव्ही वाढली आहे.

ते म्हणाले की भारतात आज जगातील सर्वात स्वस्त मोबाइल डाटा मिळतो. ट्रायच्या 2019 माहितीनुसार, मागील 5 वर्षात मोबाइल इंटरनेट डाटाच्या किंमतीत 95 टक्के कपात झाली आहे. आज भारतातील एक यूजर्स जवळपास सरासरी 10 जीबी इंटरनेट डाटा दर महिन्याला वापरतो.

गुगलने 2015 साली भारतात भारतीय रेल्वे आणि रेल्टेलच्या सहकार्याने 400 रेल्वे स्टेशनवर सार्वजनिक वाय फाय 2020 पर्यंत उपलब्ध करुन दिले होते.

सेनगुप्ता म्हणाले की आम्ही जून 2018 साली ही संख्या ओलांडली आणि देशातील टेलिकम्युनिकेशन कंपन्याच्या सहकार्याने देशभरात हजारो ठिकाणी सेवा उपलब्ध करुन दिली. ते पुढे म्हणाले की भारतीय रेल्वे आणि भारत सरकारच्या सहाय्याने आम्ही लाखो यूजर्सला मागील पाच वर्षात इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देऊ शकलो त्याबद्दल त्यांचे आभार.

नेक्स्ट बिलियन यूजर्सच्या प्रयत्नातून गुगलने नवे तंत्रज्ञान तयार केजे जे यूजर्सला इंटरनेट उपलब्ध करु शकतील. त्यांनी काही कमी इंटरनेट वापरणारे अ‍ॅप तयार केले जसे की यूट्यूब गो, गुगल गो, ऑफलाइन गुगल मॅप, ऑफलाइन यूट्यूब, काही देशात सुरु करण्यात आलेले विशेष प्रोडक्ट म्हणजे गुगल तेज पेमेंट सिस्टम, तसेच अ‍ॅण्ड्राइड गो.

तर सेनगुप्ता म्हणाले की आमच्या नेक्स्ट बिलियन यूजर्सला आणखी सशक्त करण्याचे आश्वासन देतो. आणखी लोकांना इंटरनेट वापरसाठी प्रोस्ताहित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. भारतासह नायजेरिया, थायलंड, फिलिपाइन्स, मेक्सिको, इंडोनिशिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत गुगल स्टेशन उपलब्ध आहे.

You might also like