Google चे CEO सुंदर पिचाई यांच्याविरोधात IT अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल

वाराणसी: आयटी अ‍ॅक्ट आणि कटकारस्थान रचल्याच्या आरोपाखाली गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांच्यासह १८ जणांवर वाराणसीमधील भेलूपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हा गुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. वारासणीमधील गौरीगंज परिसरात राहणाऱ्या गिरिजा शंकर यांनी फिर्याद दिली आहे.

गिरिजा शंकर यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हंटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह टीका केलेला एक व्हिडीओ व्हॉट्स अ‍ॅपच्या एका ग्रुपवर दिसला त्यानंतर ज्या क्रमांकावरून हा व्हिडीओ ग्रुपवर टाकला होता त्यावर फोन करून व्हिडीओवर गिरीजा शंकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर विशाल सिह नामक व्यक्तीने यूट्युबवर एक व्हिडीओ अपलोड केला गेला. ज्यामध्ये कथितपणे गिरिजा शंकर यांचा मोबाईल क्रमांक शेअर करण्यात आला. तसेच या व्यक्तीपासून आपल्याला धोका असल्याचे एक गाणे तयार केले. तेव्हापासून गिरिजा शंकर यांना सुमारे ८ हजार ५०० धमकीचे फोन आले आहेत. यामधून जीवे मारण्याची धमकी आणि शिविगाळ केली जात आहे.

या सर्व प्रकारानंतर गिरिजा शंकर यांनी या प्रकरणी न्यायालयात कलम १५६ अंतर्गत विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने भेलूपूर पोलीस ठाण्यात रिपोर्ट दाखल करून तपासाचे आदेश दिले. त्यानुसार न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ६ फेब्रुवारी रोजी गिरिजा शंकर यांनी भेलूपूर पोलीस ठाण्यात १८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.