Gopichand Padalkar – Ajit Pawar | अजित पवारांना लांडग्याचे पिल्लू म्हणणं पडळकरांना महागात पडणार? दिला 7 दिवसांचा अल्टीमेटम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Gopichand Padalkar – Ajit Pawar | भाजपचे आमदार (BJP MLA) गोपीचंद पडळकर यांनी काही दिवासांपूर्वी धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले होते. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. तर सुप्रिया सुळे लबाड लांडग्याची लेक आहे, असे पडळकर म्हणाले होते. मात्र, या टीकेनंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पडळकर यांना समज दिल्याचे बोलले जात आहे. परंतु आता गोपीचंद पडळकर यांना हे विधान भोवण्याची शक्यता आहे. (Gopichand Padalkar – Ajit Pawar)

बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर यांना नोटीस पाठवली आहे. पडळकर यांनी सात दिवसांत जाहीर माफी मागावी, अन्यथा पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु केली जाईल, असा इशारा नोटीसमधून दिला आहे. त्यामुळे पडळकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Gopichand Padalkar – Ajit Pawar)

या प्रकरणावर बोलताना अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले, गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर विधान केले की, अजित पवार हे लांडग्याचं पिल्लू आहे आणि सुप्रिया सुळेही लांडग्याचे पिल्लू आहे. मात्र दुसऱ्याची अब्रू नुकसान करणं, चुकीचे आहे. त्यामुळे बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांच्यातर्फे पडळकर यांना नोटीस पाठवली आहे. त्यांनी जाहीर माफी मागावी असे नोटीसमध्ये सांगितले आहे. त्यांनी सात दिवसात जाहीर माफी मागितली नाही किंवा नोटीसला उत्तर दिलं नाही, तर त्यांच्यावर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु केली जाईल.

काय म्हणाले पडळकर?

गोपीचंद पडळकर म्हणाले, धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे.

ही लबाड लांडग्याची लेक…

मराठा धनगर, लिंगायत आणि मुस्लीम समाजाची भाजपने फसवणूक केली आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते.
यावर बोलताना पडळकर म्हणाले होते, ही लबाड लांडग्याची लेक बोलत आहे. धनगर समाजाने तुमच्या पालख्या वागवल्या.
लोकांच्या चपला फाटल्या, तरी तुमच्या वडिलांनी, भावाने, पुतण्याने किंवा तुम्ही धनगर समाजाकडं बघितलं नाही.
त्यामुळे धनगर समाजबद्दल जास्त पुळका आणण्याची गरज नाही. आमचे लोक हुशार झाले आहेत, असंही
गोपीचंद पडळकर यांनी म्हटले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar On Maratha Community-Kunbi Certificate | मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं की नाही? या प्रश्नावर शरद पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar | ‘फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शरद पवारांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले’