Gopichand Padalkar | आमदार गोपिचंद पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाची सांगितली दुरावस्था

मुंबई – बहुजनांच्या वेदनेचा आवाज म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Sahityaratna Lokshahir Annabhau Sathe) होते. परंतु अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने असलेले भायखळ्यातील नाट्यगृह गेली 38 वर्षे बंद आहे. त्या नाट्यगृहाची दुरावस्था म्हणजे महाराष्ट्रातील तमाम लोककलाकारांचा आणि अण्णाभाऊ साठे यांचा अपमानच आहे, असे भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले. त्यामुळे त्याची लवकरात लवकर डागडुजी करुन ते पुन्हा सुरु करण्यासाठी गोपिचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहिले आहे.

2014 साली देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारने प्रस्ताव तयार केला आणि हे सभागृह उभे राहिले होते. परंतु महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) ते काम प्रलंबित ठेवले, असा आरोप पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला आहे. पण आता बहुजनांच्या हिताचा विचार करणारे सरकार आले आहे. त्यामुळे या सभागृहाला न्याय मिळेल. नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या प्रयत्नांमुळे रशियात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे, असे देखील पडळकर म्हणाले.

 

मुंबई येथील सभागृह उद्घाटनाचे काम गेले 17 महिने रेंगाळले आहे.
ते दिवाळी सणाच्या अगोदर मार्गी लावावे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नाट्यगृह प्रेक्षकांसाठी सुरु करावे,
हाच खरा अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव असेल, असे गोपिचंद पडळकर यांनी म्हंटले आहे.

 

Web Title :- Gopichand Padalkar | MLA Gopichand Padalkar’s letter to Chief Minister; The disrepair of Annabhau Sathe Theater was reported

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा