Gorakhpur Crime | धक्कादायक ! भाजप नेत्याच्या आई आणि दीड वर्षाच्या मुलाची फावड्याने निर्घृण हत्या, पत्नी व मुलगी गंभीर जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गोरखपूरमध्ये (Gorakhpur Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. गोरखपूरमध्ये (Gorakhpur Crime) एका भाजप नेत्याच्या आईचा आणि दीड वर्षाच्या मुलाचा निर्घृण खून (mother and son Murder) करण्यात आला आहे. तसेच आरोपीने फावड्याने केलेल्या हल्ल्यामध्ये भाजप नेत्याची पत्नी आणि 10 वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. परशुराम शुक्ला असे भाजप नेत्याचे (BJP leader Parashuram Shukla) नाव असून घटना घडली त्यावेळी ते कामानिमित्त बाहेर गेले होते. ही घटना मंगळवारी (दि.27) गोरखपूरच्या हरपूर-बुदहट पोलीस ठाण्याच्या (Harpur-Budhat Police Station) हद्दीत सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

भाजप नेता परशुराम शुक्ला यांची आई विमल शुक्ला (वय-70) त्याचा एकुलता एक मुलगा रौनक शुक्ला (वय दीड वर्षे) यांचा फावड्याने मारुन निर्घृण खून करण्यात आला आहे. तर त्यांची पत्नी सुषमा शुक्ला आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वादातून घडले हत्याकांड

मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम शुक्ला हे भाजपच्या किसान मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य आहेत. त्यांच्या घरावर सीताराम शुक्ला (Sitaram Shukla) याने हल्ला केला. सीताराम आणि परशुराम यांच्यात छतावरुन पाणी गळतं यावरुन वाद झाला होता. यासंदर्भात पोर्टलवर तक्रार दाखल करण्यात आली होती. मंगळवारी दुपारी पोलीस आयजीआरएस पोर्टलच्या (IGRS portal) तक्रारीनुसार तपास आणि चौकशीसाठी सीताराम शुक्लाच्या घरी आले होते. सीताराम हा रिक्षा चालवतो. तो संध्याकाळी घरी आला त्यावेळी त्याला पोलीस घरी येऊन गेल्याची माहिती मिळाली.

फावड्याने सपासप वार

चिडलेल्या सीताराम याने हातात फावडे घेऊन परशूराम याच्या घरी गेला.
त्याने परशुराम यांची आई आणि दीड वर्षाच्या मुलाच्या डोक्यात आणि मानेवर फावड्याने सपासप वार केले.
यामध्ये गंभीर जखमी होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला.
सासु आणि मुलाला वाचवण्यासाठी परशुराम यांच्या पत्नी सुषमा या मध्ये पडल्या. त्यावेळी आरोपीने सुषमा आणि त्यांच्या 10 वर्षाच्या मुलीवर फावड्याने वार केले.
यामध्ये त्या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.

घटनेनंतर आरोपी फरार

घटनेची माहिती मिळताच गोरखपूरचे पोलीस अधीक्षक दिनेश कुमार प्रभु (Gorakhpur Superintendent of Police Dinesh Kumar Prabhu), मनोज अवस्थी
(Manoj Awasthi), ए.के. सिंह यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले.
या घटनेची माहिती मिळताच परिसरात तणावाचं वातावरण असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
घटनेनंतर आरोपी सीताराम शुक्ला फरार झाला असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे. यासंदर्भातील वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.

 

Web Title : Gorakhpur Crime | bjp leader mother and son killed gorakhpur water drainage dispute wife and daughter injured

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

ATM Transaction Fee | बदलला एटीएममधून कॅश काढण्याचा नियम, जाणून घ्या फ्रीमध्ये किती काढू शकता ‘कॅश’

Parambir singh | परमबीर सिंग यांच्या विरोधातील गुन्ह्यांच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून SIT ची नेमणूक; 2 DCP, 2 ACP अन् महिला PI च्या अडचणी वाढ?

Health Tips | पावसाळ्यात भिजल्यावर ‘या’ पध्दतीनं करा सर्दी-खोकल्यापासून बचाव, अवलंबा ‘हे’ 5 घरगुती उपाय; जाणून घ्या