गोवर-रुबेला लसीकरण मोहीम १४ नोव्हेंबरला राबविणार- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

पुणे : प्रतिनिधी राष्‍ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्‍ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम नऊ महिने ते 15 वर्षे वयोगटातील सर्व बालकांसाठी १४ नोव्हेंबरला राबविण्‍यात येणार आहे. या मोहीमेच्‍या यशस्‍वीतेसाठी सर्व संबंधित विभागांची बैठक घेण्‍याचे निर्देश जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. या मोहीमेच्‍या यशस्‍वीतेसाठी जिल्‍हाधिकाऱ्यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हास्‍तरीय कार्यबल समिती स्‍थापन करण्‍यात आली आहे.
[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b8901637-9654-11e8-9c03-6f76aed9ffbb’]

याबाबत जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले की, भारतामध्‍ये राष्‍ट्रीय लसीकरण कार्यक्रमाच्‍या उत्‍कृष्‍ट कामगिरीमुळे 2 कोटी 70 लक्ष बालकांचे लसीकरण करण्‍यात आले आहे. तरीही भारतामध्‍ये पूर्णपणे लसीकरण झालेल्या बालकांचे प्रमाण 65 टक्‍के आहे. नॅशनल टेक्‍नीकली अॅडव्‍हायजरी ग्रूप ऑन इम्‍युनायझेशननेही गोवर रुबेला लस ही राष्‍ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समाविष्‍ट केले आहे. पुणे जिल्‍ह्यात या मोहिमेचे 9 लाख 59 हजार 282 इतके लाभार्थी अपेक्षित आहेत. मोहिमेबाबत जिल्‍हा माता बाल संगोपन अधिकारी व जिल्‍हा प्रशिक्षण संघ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण 25 जून ते 27 जून या कालावधीत पार पडले आहे.

गोवरमुळे होणारे बालमृत्‍यू, आंधळेपणा, मेंदूज्‍वर, कानाचे संक्रमण, फुफ्फुसाचे संक्रमण याप्रमाणेच रुबेलाचे प्रमाणही भारतामध्‍ये जास्त आहे. गरोदर मातेकडून बालकांना कन्‍जनायटल रुबेला सिंड्रोम (सीआरएस) होण्‍याची दाट शक्‍यता असते. सीआरएस हे बालकांमध्‍ये जन्‍मत:च व्‍यंगाचे प्रकार आहेत, ज्‍यामुळे गरोदर मातेचा गर्भपात किंवा उपजत मृत्‍यू होऊ शकतो. बालकांनाही अवयवांना धोका किंवा बालकांमध्‍ये जन्‍मजात लुळेपणा येऊ शकतो. गोवर-रुबेला आजारावर फारसा उपचार नाही, परंतु गोवर-रुबलाचे प्रमाण लसीकरणामुळे योग्‍य रित्‍या व कमी खर्चात कमी करता येऊ शकते.
[amazon_link asins=’B077PWK5QD’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bfc86267-9654-11e8-b3be-17b5dfca8233′]

राष्‍ट्रीय जंतनाशक मोहीम यशस्‍वी करा- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम.

बालकांमध्‍ये होणारा दीर्घकालीन कृमी दोष हा व्‍यापक आणि मुलांना कमजोर करणारा आहे. कृमिदोष हा रक्‍तक्षय आणि कुपोषणाचे कारण तर आहेच पण बालकांची बौध्‍दीक आणि शारिरीक वाढ खुंटण्‍याचेही कारण ठरते. यावर मात करण्‍यासाठी येत्‍या 10 ऑगस्‍ट रोजी राष्‍ट्रीय जंतनाशक मोहीम राबविली जाणार अाहे.
एक ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुलां-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्‍तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्‍य चांगले ठेवून त्‍यांची पोषण स्थिती, शिक्षण आणि जीवनाचा दर्जा उंचावणे हा या मोहिमेचा मुख्‍य हेतू अाहे. जिल्‍ह्यातील 16 लाख 37 हजार 661 मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देणार असल्‍याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितल.