खुशखबर ! आर्थिक मंदीच्या काळात ‘ही’ सरकारी कंपनी देणार 9000 जणांना नोकर्‍या, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात आर्थिक स्थिती सध्या एकदम सुस्त आहे, मंदीच्या सावटामुळे अनेक कंपन्यांमधून सर्वसामान्य लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. मात्र कोल इंडिया नावाची कंपनी एकदम उलट करत आहे.

कोल इंडियाच्या योजनेनुसार 9000 लोकांना रोजगार मिळणार आहे. यातील 4000 लोकांची नियुक्ति एग्जिक्यूटिव्ह पदावर होणार आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले कि, कोल इंडियाच्या 400 एग्जिक्यूटिव्ह मधून 900 जणांची नियुक्ति जूनियर वर्गवारीमध्ये जाहिरात आणि मुलाखतींच्या माध्यमातून होणार आहे. बाकीच्या 400 लोकांची नियुक्ति कॅम्पसच्या माध्यमातून होणार आहे. 100 एग्जिक्यूटिव्ह जणांची नियुक्ती मेडिकल स्टाफसाठी होणार आहे.

400 नॉन टेक्निकल पोस्ट्ससाठी भरती –
अधिकारीऱ्याने सांगितले कि कंपनीने आधीच 400 एग्जिक्यूटिव्ह लोकांची भरती केली आहे, ज्यात जास्ततर डॉक्टर आहेत. 75 अजून पदांच्या पण नियुक्त्या केल्या आहेत. बाकी 2200 लोकांची नियुक्ति कंपनी परीक्षेच्या माध्यमातून करणार आहे. कंपनीच्या उप कंपन्या 5000 वर्कर्स आणि टेक्निकल कंकागारांच्या नियुक्त्या करतील. 2300 नोकऱ्या या ज्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्यांच्यासाठी राखीव असणार आहेत. 2350 नोकऱ्या त्यांना दिल्या जातील ज्यांच्या कुटुंबीयांचा मृत्यू काम करताना झाला होता. यासोबतच 400 नॉन टेक्निकल पोस्ट्स वरती सुद्धा भरती होणार आहे.

वर्कर्स आणि टेक्निकल कामगारांची भरती –
मागच्या अनेक वर्षांपासून इतकी मोठी मेगा रोजगार भरती कोणत्याही सरकारी कंपनीमध्ये झालेली नव्हती. एग्जिक्यूटिव्ह कामगारांची निवड कोल इंडिया करणार आहे, तर वर्कर्स आणि टेक्निकल कामगारांची निवड कोल इंडियाशी कनेक्टेड उपकंपन्या करणार आहे. मागच्या वर्षी कंपनीने 1200 लोकांची भरती केली होती.

Visit – policenama.com