Jobs News : पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 62 हजार रुपयांपर्यंत पगार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनने (ECGC) प्रोबेशनरी ऑफीसर पदासाठीच्या भरतीची अधिकृत जाहीरात प्रसिद्ध केली आहे. या जाहीरातीत उमेदवाराची योग्यता, मासिक वेतन, अर्जाची फी यासह संपूर्ण माहिती दिली आहे.

कसा करायचा अर्ज

इच्छुक उमेदवारांना ecgc.in या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म डाऊनलोड करता येईल. ऑनलाईन अर्ज भरण्यास 1 जानेवारी 2021 पासून सुरुवात झाली आहे. 31 जानेवारी 2021 पर्यंत इच्छुकांना अर्ज करता येणार आहे.

पदांची संख्या

प्रोबेसनरी ऑफीसर पदासाठी एकूण 59 जागांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये 25 जगा अनारिक्षित प्रवर्गातील आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना 32 हजार 795 रुपये ते 62 हजार 315 रुपयांपर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. 14 मार्च रोजी या नोकरीसाठीची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल आणि परिक्षेचा निकाल 31 मार्च रोजी जाहीर केला जाईल.

कोण करु शकतो अर्ज ?

कोणत्याही क्षेत्रातील अर्थात कला, वाणिज्य किंवा विज्ञान क्षेत्रातील पदवीधर या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. अर्जदाराचे वय 21 ते 30 वर्षापर्यंत असणं बंधनकारक आहे.

शुल्क

अर्ज दाखल करण्यासाठी अनारक्षित प्रवर्गासाठी 700 रुपये शुल्क भरावे लागेल. तर आरक्षित प्रवर्गाला 125 रुपये शुल्क भरावे लागेल.

जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.ecgc.in/english/wp-content/themes/pcwebecgc/images/pcECGPagePDF/Adver/PO_Recruitment_2021-22_English.pdf