खुशखबर ! मोदी सरकारकडून शेतकर्‍यांच्या ‘उत्पन्‍न’ वाढीसाठी नवी ‘स्कीम’, 80 % पैसे देणार सरकार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी सध्या मोदी सरकार प्रयत्न करत आहे. शेतकरी आता ओला, उबेर प्रमाणे CHC Farm Machinery ऍप वरून शेतीसाठी लागणारी सर्व उपकरणे भाड्याने मागवू शकतात. जर शेतीशी निगडी व्यवसाय तुम्ही करू इच्छित असाल तर सरकार 80 % आर्थिक सहायता देणार आहे.

कस्टम हायरिंग सेंटर असे या योजनेचे नाव आहे. तुम्ही याला कृषी यंत्र बँक असे सुद्धा म्हणू शकता. ज्याच्यामार्फत शेतकरी शेतीसाठी लागणारी अनेक अवजारे भाड्याने मिळवू शकतो. हे ऍप एकदम ओला, उबेर प्रमाणे आहे. यावरील यंत्रांचा दर सरकार ठरवणार नाही तसेच ही सुविधा पाच ते पन्नास किलोमीटरमध्ये ही सुविधा मिळणार आहे. शिवाय यातील यंत्रांचा दर सरकार ठरवणार नाही उलट ज्या शेतकऱ्यांकडे आपले यंत्र पडून आहे तो शेतकरी यंत्र भाड्याने देण्यासाठी या ऍपवर टाकू शकतो.

किती आणि कशी भेटणार सरकारी मदत –

जर तुम्ही कस्टम हायरिंग सेंटर (CHC) बनवणार असला तर 40 % मदत सरकार करणार आहे. याअंतर्गत 60 लाखांपर्यंतचे प्रोजेक्ट पास केले जाऊ शकते. म्हणजेच आपल्या परिसरातील शेतकऱ्यांच्या गरजेप्रमाणे मशीन विकत घेऊ शकता. यासाठी 24 लाखांपर्यंत सरकारी सहायता मिळवता येणार आहे. जर तुम्ही को ऑपरेटिव्ह ग्रुप मिळून मशीन बँक सुद्धा तयार करू शकता. फक्त यामध्ये सहा ते आठ शेतकऱ्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. यासाठी दहा लाखांपर्यंतचा प्रोजेक्ट पास होऊ शकतो आणि यासाठी आठ लाखांपर्यंत सरकारी मदत मिळू शकते. सबसिडीचा फायदा मिळवण्यासाठी शेतकरी आपल्या भागातील कृषी विभागातील इंजिनिअरशी संपर्क करू शकतात.

गरज आणि धोका कमी करण्याचा प्रयत्न –

आधुनिक शेती करण्यासाठी नवनवीन उपकरणांची आवश्यकता असते. परंतु प्रत्येक शेतकरी ते खरेदी करू शकत नाही. त्यामुळे मोदी सरकार याबाबत स्वतः मध्यस्थी म्हणून काम करणार आहे.

कस्टम हायरिंग सेंटरचा लाभ घेण्यासाठी सरकारने एका ऍपची निर्मिती केली आहे. 12 भाषांमध्ये हे ऍप उपलब्ध आहे. 50 हजारांहून अधिक जणांनी याचे डाउनलोडींग केले आहे. अधिकाऱ्यांना याबाबत खात्री आहे की सरकारी योजनेचा फायदा घेऊन अधिकाधिकजण याचा वापर नक्की करतील.

Visit : policenama.com