राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी पुण्यातून ‘या’ 6 जणांची शिफारस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल नियुक्त विधान परिषदेतील आमदारकीसाठी पुणे शहरातील स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन महाराष्ट्र सिटीझन फोरममार्फत विविध क्षेत्रातील सहा तज्ज्ञांच्या नावाची शिफारस केली आहे. यासंदर्भात नुकतेच राज्यपालांना शिफारसपत्र पाठवल्याची माहिती पर्यावरण अभ्यासक शैलेंद्र पाटेल यांनी दिली.

राज्यातील पर्यावरणीय प्रश्नांकडे कोणत्याही राजकीय नेत्याकडून गांभीर्याने विचार केला जात नाही. याबाबतची उदासीनता दूर व्हावी या समस्यांवर ठोस उपाययोजना राबविता यावी, यासाठी विधान परिषदेत पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांची राज्यपालांनी निवड करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

पर्यावरणाचे अभ्यासक डॉ. सचिन पुणेकर, हरित चळवळीतील कार्यकर्ते व वास्तू विशारद सारंग यादवाडकर, माहिती अधिकारी क्षेत्रातील कार्यकर्ते विवेक वेलणकर, भूवैज्ञानिक उपेंद्र धोंडे, भविष्यातील नियोजन आणि पर्यावरण क्षेत्रातील अभ्यासक अनुपम सराफ आणि जलभूवैज्ञानिक, भूजलतज्ज्ञ डॉ. हिमांशू कुलकर्णी यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केली आहे, अशी माहिती फोरमचे समन्वयक पुष्कर कुलकर्णी, वैशाली पाटकर आणि शैलेंद्र पटेल यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी दिली.