महत्वाची बातमी ! पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय ?

नवी दिल्ली : देशात मोठ्या प्रमाणात महागाई झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे हे दर कमी करण्याची मागणी केली जात आहे. या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य जनतेची अडचण वाढली आहे. काही शहरांत तर पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारकडून आता लवकरच इंधनाच्या आयात शुल्कामध्ये कपात केली जाऊ शकते. ज्यामध्ये सर्वसामान्य जनतेला महागाईचा फटका बसला आहे. मार्केट एक्सपर्टनुसार, सरकार आता लवकरच आयात शुल्काच्या दरात कपात केल्याचे जाहीर करू शकते. सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या आयात शुल्कात 8.50 रुपये प्रतिलिटरची कपात केली जाऊ शकते. सरकारकडून सध्या एवढीच कपात केली जाऊ शकते. यापेक्षा जास्त कपात केली तर महसूलावर याचा परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे.

टॅक्स कलेक्शनचे ध्येय 3.2 लाख कोटी

इन्व्हेस्टमेंट फर्म ICICI Securities च्या एक्सपर्ट्सनुसार, आर्थिक वर्ष 2020-21 साठी पेट्रोल-डिझेलच्या माध्यमातून टॅक्स कलेक्शनचे लक्ष्य सुमारे 3.2 लाख कोटींपर्यंत गेला आहे. तर सध्या एक्ससाईज ड्युटीनुसार, सरकारला सुमारे 4.35 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळेल. त्यानुसार आता 8.50 रुपये शुल्कात कपात करू शकते.

आता एक्ससाईज ड्युटी किती?

कोरोना व्हायरसच्या महामारीनंतर केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील एक्ससाईज ड्युटी वाढवली आहे. सरकारने पेट्रोलवरील एक्ससाईज ड्युटी 13 रुपये आणि डिझेलवर 16 रुपये प्रतिलिटर एक्साईज ड्युटी वाढवली आहे. त्यामुळे हे शुल्क 32.9 रुपये आणि डिझेलवर 31.8 रुपये झाले होते. या सर्व बाबींमुळे इंधनाच्या दरात वाढ होत आहे. मात्र, आता हे सरकारकडून आयात शुल्कात कपात केली जात आहे.