Gram Panchayat Election | पुण्यात बिनविरोध लढतीत भाजपच्या वाट्याला एक ग्रामपंचायत; राष्ट्रवादीला मोठा विजय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विविध जिल्ह्यात आज (दि. 18 डिसेंबर) ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान (Gram Panchayat Election) होत आहे. एकूण 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 221 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक (Gram Panchayat Election) होत आहे. त्यापूर्वी 43 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यात राष्ट्रवादीला मोठे यश मिळाले असून भाजपला मोठा दणका मिळाला आहे. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे. भाजपला केवळ एकच बिनविरोध जागा मिळाली आहे.

 

 

 

पुण्यातील 43 ग्रामपंचायतींचा निकाल बिनविरोध लागला आहे. त्यात राष्ट्रवादीला 21, काँग्रेस 13, ठाकरे गट 3, शिंदे गट 2 भाजप 1 आणि रिक्त 1 असा निकाल लागला आहे. याचवेळी जळगाव जिल्ह्यात देखील बिनविरोध जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. जळगाव जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायतींपैकी 18 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यातील सर्वाधिक 9 जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहेत. भाजपकडे 5 आणि शिंदे गटाला 3 जागा बिनविरोध मिळाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 474 गावांसाठी ग्रामपंचायत निवडणुका पार पडत आहेत. कोल्हापूरला 45 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

बिनविरोध निकालात जरी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीवर असले, तरी मूळ ग्रामपंचायतीचा निकालात (Gram Panchayat Election) कोण आघाडीवर असेल, याची मतदार आणि राज्यकर्त्यांना उत्सुक्ता आहे.
त्यामुळे निकालापर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपला चढता क्रम कायम ठेवणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
तसेच सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाचे काय होणार, याकडे देखील सर्वांचे लक्ष वेधले आहे.

 

 

Web Title :- Gram Panchayat Election | ncp unopposed in 21 seats in gram panchayat elections in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा